TRENDING:

नवीन वर्षात दारात आणा 35 किमी मायलेज देणारी Car, मारुतीकडून बंपर ऑफर

Last Updated:
दिवाळीमध्ये लोकांनी बंपर खरेदी केली आहे. पण तरीही तुम्ही कार किंवा एसयूव्ही खरेदी करू शकला नसाल तर डिसेंबरमध्ये इअर अँड ऑफर सुरू झाली आहे.
advertisement
1/7
नवीन वर्षात दारात आणा 35 किमी मायलेज देणारी Car, मारुतीकडून बंपर ऑफर
जीएसटीच्या दर कपातीनंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. दिवाळीमध्ये लोकांनी बंपर खरेदी केली आहे. पण तरीही तुम्ही कार किंवा एसयूव्ही खरेदी करू शकला नसाल तर डिसेंबरमध्ये इअर अँड ऑफर सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कार आणि एसयूव्हीवर चांगली ऑफर आणली आहे.
advertisement
2/7
[caption id="attachment_1509675" align="alignnone" width="750"] Maruti Suzuki Wagon R - मारुतीची सगळ्या जास्त विक्री असलेली Maruti Suzuki Wagon R वर   ५८,१०० रुपयांची सूट दिली आहे.  यामध्ये कॅशबॅक, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस आणि काही इतर फायदे मिळणार आहे.  ज्यामुळे  सध्याच्या ऑफरमध्ये तुम्हाला Maruti Suzuki Wagon R ही आणखी स्वस्त मिळणार आहे. या कारची किंमत आता ५ लाखांपासून सुरू झाली आहे. Maruti Suzuki Wagon R ची जमेची बाजू म्हणजे, मायलेज हे सीएनजीमध्ये ३५ किमी इतकं ऑफर करते.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/7
[caption id="attachment_1418949" align="alignnone" width="750"] maruti suzuki swift :  मारुती सुझुकी स्विफ्ट पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारवर ५५,००० पर्यंत बचत होईल. maruti suzuki swift तिच्या स्पोर्टी डिझाइन, दमदार कामगिरी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
4/7
Alto K10, S-Presso आणि Celerio वर सुद्धा 52,500 पर्यंत सूट दिली आहे. तर कॉम्पॅक्ट SUV श्रेणीमध्ये, Maruti Suzuki Brezza वर 40,000 पर्यंत सूट दिली आहे. तसंत कॅशबॅक आणि एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनसचा सुद्धा समावेश आहे. 
advertisement
5/7
Maruti Suzuki Eeco – मारुतीची फॅमिली कार म्हणून ओळखली जाणारी Maruti Suzuki Eeco वर देखील 52,500 पर्यंत सूट दिली आहे. ही एक एमपीव्ही सेगमेंटमध्ये येते. यामध्ये ७ सीटर आणि ६ सीटर असे मॉडेल आहे.
advertisement
6/7
Dzire Sedan :  मारुती सुझुकीची सेडान सेगमेंटमध्ये Dzire  डीलर स्तरावर 12,500 पर्यंत सूट दिली जात आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडानला सुमारे एक वर्षापूर्वी एक मोठं अपडेट मिळालं होतं आणि तिच्या नवीन डिझाइन आणि आधुनिक इंटीरियरला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. BNCAP कडून पाच-स्टार रेटिंग मिळाल्याने ते सुरक्षिततेमध्ये देखील हा एक बेस्ट पर्याय आहे. 
advertisement
7/7
एर्टिगा : मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही maruti suzuki ertiga वर १०,००० पर्यंत थेट कॅश ऑफर दिली आहे. maruti suzuki ertiga ही एक ७ सीटर एमपीव्ही आहे.  कारच्या ऑफर आणि किंमतीमध्ये ज्या त्या राज्यानुसार बदल असणार आहे, त्यामुळे जवळच्या शोरूम किंवा डिलरकडून किंमती पडताळून घ्या. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
नवीन वर्षात दारात आणा 35 किमी मायलेज देणारी Car, मारुतीकडून बंपर ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल