मारुती सुझुकी कंपनीचा एक निर्णय अन् Alto To Wagon R लोकप्रिय गाड्या महागणार, कारण काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बजेटनंतर मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार केला असून, प्राइस प्रोटेक्शन स्कीम लागू केली आहे. व्हिक्टोरीस SUVची मागणी वाढली, नवीन प्लांट एप्रिल २०२६ला सुरू होणार.
advertisement
1/7

बजेट सादर झालं आणि त्यानंतर शेअर मार्केट कोसळलं, भारत अमेरिका ट्रेड डील झालं आणि शेअर मार्केट वधारलं मात्र ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली. सर्वसामान्य लोकांची लोकप्रिय कार असलेल्या मारुती सुझुकीने मोठा निर्णय घेतला. बजेटनंतर घेतलेल्या या निर्णयाचा भार हा सर्वसामान्य लोकांच्या थेट खिशावर पडणार आहे.
advertisement
2/7
जर तुम्ही मारुती सुझुकीची नवी कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आता आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे.
advertisement
3/7
कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याने कंपनीवर हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, "कमोडिटी मार्केटमध्ये स्टील आणि मौल्यवान धातूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
advertisement
4/7
ग्राहकांवर वाढीव खर्चाचा बोजा पडू नये, असा आमचा प्रयत्न असतो, पण जर खर्च आवाक्याबाहेर गेला, तर त्याचा काही भार ग्राहकांवर टाकावाच लागेल." ज्या ग्राहकांनी आधीच कार बुक केली आहे, पण अजून डिलिव्हरी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी कंपनीने 'प्राइस प्रोटेक्शन स्कीम' सुरू केली आहे.
advertisement
5/7
यामुळे जुन्या बुकिंगवर शक्यतो जुन्याच किमतीत कार देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. सध्या मारुतीकडे १.७५ लाख वाहनांच्या ऑर्डर्स प्रलंबित (Pending) आहेत, तर एकट्या जानेवारी महिन्यातच कंपनीला २.७८ लाख नवीन बुकिंग्स मिळाल्या आहेत.
advertisement
6/7
[caption id="attachment_1608852" align="alignnone" width="750"] सप्टेंबर २०२५ मध्ये जीएसटी २.० लागू झाल्यानंतर मारुतीने आपल्या गाड्यांच्या किमतीत मोठी कपात केली होती. ऑल्टो के.१०, एस-प्रेसो आणि वॅगन-आर सारख्या मॉडेल्सच्या किमती ७९ हजारांपासून ते १.२९ लाखांपर्यंत कमी झाल्या होत्या. यामुळे जानेवारी महिन्यात मारुतीने आतापर्यंतच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, कंपनीला दररोज सरासरी ९ ते १० हजार नवीन बुकिंग्स मिळत आहेत.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
मारुतीची नवीन एसयूव्ही व्हिक्टोरीस सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून केवळ ५ महिन्यांत ५० हजार युनिट्सची विक्री झाली आहे. मात्र, मागणी जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती असल्याने ग्राहकांना वेटिंग पिरीयडचा सामना करावा लागत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत हरियाणातील खरखौदा येथील नवीन प्लांट सुरू झाल्यानंतरच ही उत्पादनाची अडचण दूर होईल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मारुती सुझुकी कंपनीचा एक निर्णय अन् Alto To Wagon R लोकप्रिय गाड्या महागणार, कारण काय?