Renault Duster: 'ती' आली तिने पाहिलं आणि जिंकलं! अखेर धाकड SUV परतली, लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
मागील अनेक दिवसांपासून Renault Duster 2026 ची चर्चा सुरू होती. अखेरीस कंपनीने प्रजासत्ताक दिनी Renault Duster 2026 भारतात लाँच केली आहे. नवीन डस्टरही आधीच्या SUV पेक्षा जास्त मजबूत आणि दिसायला आकर्षक अशीच आहे.
advertisement
1/10

भारतात एकेकाळी रस्त्यावर राज्य करणारी डस्टर Renault Duster 2026 अखेरीस परत आली आहे. मागील अनेक दिवसांपासून Renault Duster 2026 ची चर्चा सुरू होती. अखेरीस कंपनीने प्रजासत्ताक दिनी Renault Duster 2026 भारतात लाँच केली आहे. नवीन डस्टरही आधीच्या SUV पेक्षा जास्त मजबूत आणि दिसायला आकर्षक अशीच आहे. या एसयूव्हीचं प्री बुकिंग सुरू झालं आहे, २१ हजार रुपये भरून तुम्ही ही एसयूव्ही बूक करू शकता.
advertisement
2/10
मागील अनेक वर्षांपासून Renault Duster 2026 च्या लाँचबद्दल चर्चा सुरू होती. अखेरीस Renault मोटर्सने भारतात ही एसयूव्ही लाँच केली आहे. नव्या Renault Duster 2026 च्या डिझाईनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. आधीच्या डस्टरपेक्षा ही दिसायला वेगळी आणि आकर्षक अशी आहे. नव्या Renault Duster 2026 मध्ये LED DRLs, कनेक्टेड LED टेल लॅम्प्ससह नव्या डिझाईनचा बंपर दिला आहे. त्यामुळे या एसयूव्हीला वेगळा असा लूक येतोय.
advertisement
3/10
Renault Duster 2026 च्या केबिनबद्दल बोलायचं झालं तर आतमध्ये हायटेक असा लूक दिला आहे. प्रीमियम डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल आणि लेदरेट सीट दिले आहे. 3-स्पोक स्टीयरिंग व्हिल आणि डुअल डिजिटल डिस्प्ले दिले आहे.
advertisement
4/10
Renault Duster 2026 मध्ये ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टमसह अॅडप्टिव क्रूज कंट्रोल360 डिग्री अराउंड व्यू 3D कॅमेरा, पॅनोरमिक सनरूफ, इलेक्ट्रिक पावर्ड टेलगेट दिले आहे
advertisement
5/10
विशेष म्हणजे, या एसयूव्हीमध्ये तब्बल ७०० लिटर इतकं बुट स्पेस दिलं आहे, जे सनरुफपासून आहे. एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात मोठी जागा आहे.
advertisement
6/10
Renault Duster 2026 मध्ये ज्या ज्या गोष्टींची कमी होती ती पूर्ण करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक सनरुफ दिला आहे. सोबतच मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स दिले आहे. सेफ्टीसाठी एसयूव्हीमध्ये 6 एयरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
7/10
इंजिन कसं आहे? Renault Duster 2026 ही ऑफ-रोडिंगसाठी पॉवरफुल इंजिन दिलं आहे. नवीन डस्टरमध्ये ३ इंजिनचा पर्याय दिला आहे. पहिला पर्याय हा, 1.3-लीटर टर्बो Tce इंजिन दिलं आहे जे 160 PS इतकी पॉवर जनरेट करेल. Renault Duster 2026 मध्ये ऑल व्हिल ड्राईव्ह अर्थात AWD (All-Wheel Drive) चा ऑप्शन दिला आहे.
advertisement
8/10
तसंच दुसरा पर्याय हा १.८ लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिन पर्याय दिला आहे, जे ई टेक पेट्रोलसह येईल. यामध्ये १.४ kwh ची बॅटरी सुद्धा दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, शहरात ही एसयूव्ही ८० टक्के पूर्णपणे EV मोडवर चालू शकते.तिसरा पर्याय हा १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा असणार आहे.
advertisement
9/10
किंमत किती? Renault Duster 2026 ची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही. आजपर्यंत Renault Duster 2026 लाँच करण्यात आली आहे. अधिकृत किंमतीबद्दल लवकरच घोषणा केली जाईल, तरीही मार्केटमधील इतर एसयूव्हीच्या तुलनेत Renault Duster 2026 ची किंमत ही अंदाजे 10 लाखांपासून सुरू होऊ शकते, ती टॉप मॉडेल हे १८ लाखांपर्यंत असेल.
advertisement
10/10
Renault Duster 2026 ची प्री बुकिंग सुरू झाली आहे. २१ हजार रुपये भरून तुम्ही ही एसयूव्ही बूक करू शकता. या एसयूव्हीची डिलिव्हरी एप्रिल महिन्यात सुरू होईल. दिवाळीच्या दरम्यान, Renault Duster 2026 ही हायब्रिड इंजिन असलेल्या पर्यायही दिला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Renault Duster: 'ती' आली तिने पाहिलं आणि जिंकलं! अखेर धाकड SUV परतली, लूक पाहून पडाल प्रेमात