TRENDING:

Tata Sierraचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट 1 लाखांच्या डाउन पेमेंटवर मिळेल? पाहा EMIचं गणित

Last Updated:
Tata Sierra Finance Plan: तुम्ही टाटा सिएराला फायनेन्स करण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपण गाडी खरेदीविषयी डिटेल्स जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5
Tata Sierraचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट 1 लाखांच्या डाउन पेमेंटवर मिळेल? EMI किती?
भारतीय बाजारात उपलब्ध टाटा सिएराला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अशावेळी तुम्ही SUV खरेदीची प्लॅनिंग करत असाल तर या कारचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट तुम्हाला किती डाउन पेमेंटवर मिळेल हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासोबतच आपण भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध या गाड्यांच्या रायवल्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/5
Tata Sierra बेस मॉडेल फायनान्स प्लॅन : टाटा सिएरा बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक मॉडेलसाठी 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही दिल्लीमध्ये Tata Sierra Smart Plus 1.5 पेट्रोल बेस मॉडेल खरेदी केले तर त्याची ऑन-रोड किंमत अंदाजे 13.44 लाख रुपये आहे. या किंमतीत आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. शहरांमध्ये किंमती थोड्या वेगळ्या असू शकतात.
advertisement
3/5
तुम्हाला दरमहा किती EMI भरावे लागेल? : तुम्ही Tata Sierra च्या बेस मॉडेलला फायनान्स केले तर तुम्हाला किमान 1 लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. डाउन पेमेंटनंतर, तुमच्या कर्जाची रक्कम अंदाजे 13.29 लाख रुपये असेल. तुम्हाला 9.8% व्याजदराने 5 वर्षांचे (60 महिन्यांचे) कर्ज मिळाले तर तुमचा मासिक EMI अंदाजे 25,997 रुपये असेल. तुमच्या बँकेच्या व्याजदरानुसार आणि प्रोसेसिंग चार्जनुसार हा EMI थोडा बदलू शकतो.
advertisement
4/5
Tata Sierraचा पॉवरट्रेन आणि मायलेज : टाटा सिएरा 2025 मध्ये 1.5- लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 105 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क तयार होते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळते. हे इंजिन शहरातही स्मूथ चालते आणि हायवेवर आरामदायक राइड देते. गाडीचा ड्रायव्हिंग पोस्चर उंच आहे आणि ज्यामुळे चांगला एसयूव्ही फील मिळतो.
advertisement
5/5
कोणत्या वाहनांशी स्पर्धा करते? : टाटा सिएराचे मायलेज 18.2 kmpl पर्यंत आहे. जे तिच्या सेगमेंटमध्ये खूप चांगले मानले जाते. या एसयूव्हीमध्ये टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डिझेल इंजिन ऑप्शन देखील आहेत. भारतीय बाजारपेठेत, Tata Sierra, Hyundai Creta, Kia Seltos आणि Renault Dusterसह अनेक वाहनांशी स्पर्धा करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierraचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट 1 लाखांच्या डाउन पेमेंटवर मिळेल? पाहा EMIचं गणित
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल