Bigg Boss Marathi 6 : जवळच्या व्यक्तीकडून तन्वीचा पर्दाफाश! राखीचा प्लान सक्सेस, फिनाले आधी 'काटा गँग' फुटणार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6 च्या फिनाले आधी घरात मोठा घडामोड घडणार आहे. खरंच काटा ग्रुप फुटणार? राखीचा प्लान सक्सेस होणार?
advertisement
1/7

बिग बॉस मराठ 6 च्या घरात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. 13 व्या आठवड्यात घरात आलेल्या राखीने तिला जे हवं होतं ते मिळवलं आहे. राखीचे प्रयत्न सरळ संपूर्ण होऊन काटा ग्रुपमध्ये फाटाफूट होणार असं दिसतंय. तन्वीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून तिचा पर्दाफाश झाल्याचं राखीनं सांगितलं आहे.
advertisement
2/7
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी आणि तन्वी यांच्यात जोरदार वाद होताना दिसतो. राखी थेट तन्वीवर आरोप करत म्हणते, "तुझं रडणं खोटं आहे. भांडण करणं खोटं आहे. तू वरून खालपर्यंत खोटारडी आहे." या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच चिघळतं.
advertisement
3/7
राखीच्या या आरोपांना तन्वीही ठामपणे उत्तर देते. म्हणते, "लिमिट क्रॉस होतेय राखी". मात्र राखी थांबत नाही आणि पुढे म्हणते, "हिने (दिपाली) सगळा पडदा फाश केलाय." यावर तन्वी भावनिक होत म्हणते, "मला लोकं बोलतात तेव्हा फरक पडत नाही, पण आपली माणसं बोलतात तेव्हा फरक पडतो."
advertisement
4/7
राखी म्हणते, "काटाने तुझ्या तोंडावर मारला चाटा… सटाक." या संवादामुळे काटा ग्रुपमधील तणाव असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, दुसऱ्या प्रोमोमध्ये राखी पुन्हा तन्वीवर निशाणा साधताना दिसते. "असं ट्रॉफीमध्ये जाणार का पुढे? खोटं खोटं करून… माझ्या बिग बॉसच्या शोमध्ये", असं ती म्हणते.
advertisement
5/7
यावर तन्वीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देते. "राखी, तुला माहितीये कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तू मला लाख कोशिश कर माझ्याबद्दल बोलायची, इन्स्टिगेट करायची… पण तुझ्या बोलण्याने मला फरक पडत नाही".
advertisement
6/7
दरम्यान वकिली टास्कदरम्यानही काटा ग्रुपमध्ये काही खटके उडाले होते. तन्वी, राकेश, दिपाली आणि रेखा हे या ग्रुपचे सदस्य असून, त्यांच्यातील नातं आता तणावात आलेलं दिसतं. तन्वी आणि दिपाली यांच्यातही जुन्या गोष्टींवरून वाद झालेत.
advertisement
7/7
आता आजच्या भागात त्यांच्यातील हा वाद किती वाढतो आणि खरंच काटा ग्रुप तुटतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : जवळच्या व्यक्तीकडून तन्वीचा पर्दाफाश! राखीचा प्लान सक्सेस, फिनाले आधी 'काटा गँग' फुटणार?