Tata ची SUV निघाली टँकसारखी मजबूत, ऊसाने भरलेली ट्रॉली गाडीवर उलटली; सगळे सेफ! पुण्यातले PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यातील चाकण इथं पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी इथं संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या महामार्गावर ऊस वाहतूक करणारा टँक्टर ट्रॉली आणि टाटा पंच ईव्ही कारचा विचित्र अपघात झाला. (सचिन तोडकर, प्रतिनिधी)
advertisement
1/8

भारतात सध्या अपघातांचं प्रमाण पाहता सेफ कार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यातच भारतीय कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या कार आणि एसयूव्ही या सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग घेऊन सगळ्यात सुरक्षित ठरल्या आहे. अशातच टाटा मोटर्सच्याा टाटा पंच EV चा पुण्यातील चाकणमध्ये वित्रित अपघात झालाा. ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पंचवर कोसळला. पण, टाटा पंच EV ला काहीच झालं नाही.
advertisement
2/8
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण इथं पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी इथं संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
advertisement
3/8
या महामार्गावर ऊस वाहतूक करणारा टँक्टर ट्रॉली आणि टाटा पंच ईव्ही कारचा विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी टाटा पंच EV ही चालकाकडून अचानक अनियंत्रित झाली. त्यानंतर टाटा पंच EV ही डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ऊसाच्या टँक्टर ट्रॉलीला धडकला.
advertisement
4/8
धडक बसल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली कार अडकली होती. कारच्या निम्या भागावर ऊसाची ट्रॉली अडकली होती.
advertisement
5/8
पण, सुदैवाने याा अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. टाटा पंचमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
advertisement
6/8
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने अडकलेली टाटा पंच EV बाहेर काढण्यात आली.
advertisement
7/8
मात्र, या अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
advertisement
8/8
वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या मेहनतीनंतर अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पुर्वपदावर आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata ची SUV निघाली टँकसारखी मजबूत, ऊसाने भरलेली ट्रॉली गाडीवर उलटली; सगळे सेफ! पुण्यातले PHOTOS