TRENDING:

पतीचं निधन, पत्नीनं उचलली घराची जबाबदारी अन् मुलाला बनवलं IPS, जिद्दीची अनोखी कहाणी

Last Updated:
Mother's Day Special : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, इतकं आईचं महत्त्व आहे. आज सर्वत्र मदर्स डे साजरा केला जात आहे. यातच आम्ही तुम्हाला आई आणि मुलाच्या संघर्षाची एक अनोखी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. या महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतर परिस्थितीचा सामना करत मुलाला IPS पदापर्यंत पोहोचवले. (ऋतु राज/मुजफ्फरपुर)
advertisement
1/5
पतीचं निधन, पत्नीनं उचलली घराची जबाबदारी अन् मुलाला बनवलं IPS, जिद्दीची अनोखी...
मुजफ्फरपुर येथील मीनापुरच्या मुकसूदपुर येथील रीना देवी यांची ही कहाणी आहे. त्यांनी आपल्या मुलाला आयपीएस अधिकारी पदापर्यंत पोहोचवलं. त्यांचा मुलगा विशाल कुमार याने 2022 च्या यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत 484 वी रँक मिळवून आपली आई तसेच आपल्या जिल्ह्याचा मान वाढवला.
advertisement
2/5
रीना देवी अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. त्यांनी सांगितले की, 2009 मध्ये विशाल छपरा येथील रामकिशोर उच्‍च विद्यालयात आठवीच्या वर्गात असताना त्यांचे वडील बिकाऊ प्रसाद यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर तीन मुलांची जबाबदारी आली. तसेच त्यांच्या आयुष्याचा मार्ग खडतर झाला होता. मात्र, तरीही त्यांनी मुलांमध्ये असलेली अभ्यासाची ओढ पाहून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा निर्णय केला.
advertisement
3/5
रीना देवी या लोकल18 शी बोलताना पुढे म्हणाल्या की, विशालचे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच सरकारी शाळेतून झाले. यानंतर आर के हायस्कूल येथून दहावीचे शिक्षण घेते. त्यावेळी तो जिल्ह्यात टॉपर होता. यानंतर लंगट सिंह कॉलेज येथील बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याची सुपर 30 मध्ये निवड झाली. आयआयटी कानपूर येथून बीटेक केल्यावर रिलायन्स मध्ये त्याने नोकरीला सुरुवात केली. मात्र, नोकरीवर तो समाधानी नव्हता. माझी नोकरी करताना मला आनंद मिळत नाही. तसेच मला यापेक्षा आणखी काहीतरी चांगले आपल्या देशासाठी करायचे आहे, अशी त्याची इच्छा होती.
advertisement
4/5
त्याचे कुटुंबीय म्हणाले की, बालपणापासून तो हुशार होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो खचला नाही. त्याचा लहान भाऊ राहुल सांगतो की, माझ्या मोठ्या भावाने खूप संघर्ष करुन हे स्थान मिळवले आहे. पैसे कमी असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केल्या. तसेच त्याने अभ्यानंद सर यांच्या सुपर 30 मध्ये अभ्यास केला.
advertisement
5/5
दरम्यान, 2022 च्या यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत 484 रँक मिळवत त्याची आयपीएस ही सेवा मिळवली. सध्या विशाल आयपीएस आहे आणि हैदराबाद याठिकाणी ट्रेनिंग करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
पतीचं निधन, पत्नीनं उचलली घराची जबाबदारी अन् मुलाला बनवलं IPS, जिद्दीची अनोखी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल