TRENDING:

रिक्षा चालक अन् रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांच्या मुली राज्यात टॉपर, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी!

Last Updated:
ग्रामीण भागातल्या तसेच आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या कुटुंबातील मुलीही आज आपल्या मेहनतीनं समाजात मोठा आदर्श उभा करत आहेत. पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये आता रस्त्यावर भाजी विकणाऱ्या पासून ते रिक्षा चालवणाऱ्यांच्या मुलींनी परिक्षेत टॉप केले आहे. (राहुल दवे/इंदौर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
रिक्षा चालक अन् रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांच्या मुली राज्यात टॉपर, संघर्षाची..
मंगळवारी सायंकाळी 4 वाजता मध्यप्रदेश बोर्डाच्या 12 वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाले. यामध्ये ग्वाल्हेर येथील मुलींनी कमाल केली. श्रुतिने मध्यप्रदेश पाचवा तर दिव्याने आठवा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुली या सरकारी शाळेत शिकलेल्या आहेत.
advertisement
2/5
भाजीपाला विकून आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण करणारे राजेश भिलवार यांना मोठा आनंद झाला आहे. त्यांची मुलगी दिव्या हिने राज्यात आठवा क्रमांक मिळवला आहे. आपल्या मुलीच्या या कामगिरीमुळे त्यांना मोठा अभिमान वाटत आहे. आज आम्हा सर्वांना मोठा आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
advertisement
3/5
दिव्याने कोणत्याही कोचिंग विना दिवसरात्र मेहनत करुन हे यश मिळवले. तिला कलेक्टर बनून मुलींसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणूनच आयएएस अधिकारी होण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करुन यश मिळवेन, असे ती म्हणाली.
advertisement
4/5
तसेच श्रुति गौतम हिने कला शाखेत एमपीमध्ये आठवा क्रमांक मिळवला. श्रुति ही शासकीय उत्कृष्ट विद्यालय मुरार क्रमांक 1 ची विद्यार्थिनी आहे. तिने 500 पैकी 479 गुण मिळवले. कोणत्याही कोचिंगविना तिने हे यश मिळवले. माझ्या मुलीने खूप मेहनत केली आणि पुढेही ती अशीच मेहनत करेल. तसेच तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, अशी भावना तिची आई यांनी व्यक्त केली.
advertisement
5/5
श्रुतीलाही कलेक्टर बनून समाजासाठी काम करायचे आहे. श्रुतीचे वडील रिक्षा चालवतात. श्रुतीच्या या यशानंतर तिच्या सर्व कुटुंबात तसेच शाळेत आनंदाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
रिक्षा चालक अन् रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांच्या मुली राज्यात टॉपर, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल