जिद्द महत्त्वाची! साताऱ्यातील मायलेकी सोबत झाल्या बारावी पास, दुर्गम भागात राहून मिळवलं यश
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील मायलेकीने सोबतच बारावी पास होण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
advertisement
1/6

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये <a href="https://news18marathi.com/tag/satara-news/">सातारा</a> जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी या गावातील मायलेकीने सोबतच बारावी पास होण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
advertisement
2/6
पुष्पा भरत साळुंखे आणि मुलगी सुप्रिया भरत साळुंखे या दोन्ही मायलेकी यंदा बारावी पास झाल्या आहेत. सन 1995-96 मध्ये शाळा सोडल्यानंतर पुन्हा 2022 मध्ये बारावी पास होण्याची मनाशी पुष्पा यांनी जिद्द धरली होती. यानंतर चक्क दोघी मायलेकी सोबत बारावी पास झाल्या आहेत.
advertisement
3/6
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी हे गाव तसं दुर्गम आणि डोंगराळ भागातील गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जाताना अनेक शक्कल लाडवावे लागतात. देवाची शेंबडी इथे बस सेवा सुरू नाही. त्यामुळे तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास करत डोंगरातून, घनदाट झाडीतून, पाऊलवाट तुडवत पुष्पा या साताऱ्याला येतं असतं. सातारा येथील कला वाणिज्य महाविद्यालय इथे त्यांनी गतवर्षी अकरावीला प्रवेश घेतला. त्यानंतर यंदा त्यांनी बारावीची परीक्षा दिली.
advertisement
4/6
1995-96 साली पुष्पा यांची दहावी झाली. दहावी पास होताच वडील धोंडीराम शिंदकर यांनी पुष्पा यांचे भरत साळुंखे यांच्याशी लग्न लावून दिले. पुष्पा यांचे माहेर बामनोली तर सासर देवाची शेंबडी होते. दोन्ही बाजूची घरची परिस्थिती हालकीची होती. नवराही मोलमजुरीचे काम करायचा. दोघांचा संसार सुरू झाला दोघांचे पाच जण झाले. तीन मुले जन्माला आली. भरत साळुंखे हे मुलासोबत मुंबईमध्ये राहू लागले.
advertisement
5/6
संसार चालवण्यासाठी त्यांनी मलमजुरीची नोकरी सुरू केली. पगार अत्यंत कमी असल्याने आर्थिक परिस्थिती अजून देखील सुधारली नव्हती, त्यामुळे घर चालवण्यासाठी पुष्पा यांनी अंगणवाडी सेविकेसोबत मदतनीस म्हणून काम सुरू केले. हे करत असताना शिक्षण घेऊन पदवीधर झाले तर अंगणवाडी सेविका होऊ शकते ही महत्वाकांक्षा पुष्पा यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी बारावीची परीक्षा दिली.
advertisement
6/6
याचवेळी मुंबईमध्ये शिक्षण घेत असणारी मुलगी सुप्रियाहिने बारावीची परीक्षा दिली. दोघेही एकाच वेळी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून पुष्पा यांना कलाशाखेत 39.83 टक्के गुण मिळाले तर सुप्रिया हिला वाणिज्य शाखेत 56 टक्के गुण मिळाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
जिद्द महत्त्वाची! साताऱ्यातील मायलेकी सोबत झाल्या बारावी पास, दुर्गम भागात राहून मिळवलं यश