IIT Bombay मधून शिक्षण, आता United Nations कडून सर्वात मोठा लष्करी सन्मान, कोण आहेत मेजर राधिका सेन?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव मोठं करत आहेत. यातच आता आणखी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत असलेल्या राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने म्हणजे यूनायडेट नेशन्सच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. यूनायटेड नेशन्स मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आज जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी. (पंकज शिंगटा/शिमला, प्रतिनिधी)
advertisement
1/6

हिमाचल प्रदेशच्या असलेल्या मेजर राधिका सेन यांनी हिमाचल प्रदेशसह संपूर्ण भारताचे नाव मोठे केले आहे. मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वात मोठ्या सैन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यूनायटेड नेशन्स मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कांगो मध्ये संयुक्त राष्ट्र शांती रक्षक दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांना सन्मानित केले.
advertisement
2/6
मेजर राधिका सेन या मार्च 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत काँगो लोकशाही प्रजासत्ताक (Democratic Republic of the Congo) याठिकाणी तैनात होत्या. त्या इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनच्या टीम कमांडर होत्या. यामध्ये त्यांनी 20 महिला आणि 10 पुरुष सैनिकांच्या टीमचे नेतृत्व केले.
advertisement
3/6
मेजर राधिकाचे काम काँगोच्या लोकांशी संवाद करणे, संघर्षग्रस्त भागातील महिला आणि मुलांना हिम्मत देणे आणि विस्थापित लोकांच्या समस्या सोडवणे हे होते. राधिका यांच्या नेतृत्वाखाली, टीमने लैंगिक समानता, रोजगार, मुलांची काळजी, शिक्षण आणि महिलांचे आरोग्य या विषयांवर शैक्षणिक सत्रे आयोजित केली.
advertisement
4/6
मेजर राधिका सेन या मूळ हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर तालुक्यातील भडोह वार्डातील रहिवासी आहेत. बायोटेक्नोलॉजी इंजीनिअरींगच्या शिक्षणानंतर आयआयटी मुंबई येथून मास्टर्सचे शिक्षण घेतले. त्या 8 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अत्यंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या मेजर राधिका सेन या दुसऱ्या भारतीय सैनिक आहेत. याआधी मेजर सुमन गवानी यांना 2019 मध्ये युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
advertisement
5/6
राधिका सेन यांचे वडील ओंकार सेन हे सरकारी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, हमीरपूर येथून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. तर आई निर्मला सेन चौहार व्हॅलीच्या कथोग शाळेतून निवृत्त झाल्या आहेत. राधिकाच्या वडिलांना तीन भाऊ आहेत आणि चारही भावांना प्रत्येकी दोन मुली आहेत. त्यांच्या सर्व मुली उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि कुटुंबाचे तसेच देशाचे नाव मोठे करत आहेत.
advertisement
6/6
दरम्यान, राधिका यांचे वडील ओंकार सेन यांनी आपल्या मुलीचे यश हे देशाचे सैन्य, देशवासीय आणि सुंदरनगरच्या जनतेला समर्पित केले आहे. राधिका यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
IIT Bombay मधून शिक्षण, आता United Nations कडून सर्वात मोठा लष्करी सन्मान, कोण आहेत मेजर राधिका सेन?