TRENDING:

photos : गरिबांच्या मुलांच्या पंखांना दिलं बळ, शिक्षिकेच्या कौतुकास्पद कार्याची प्रेरणादायी गोष्ट!

Last Updated:
शिक्षणाचे दान व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचाही विकास करते. त्याला नवीन दिशा देते. एक शिक्षिका असेच एक महत्त्वाचे कार्य करत आहे. नाममात्र शुल्क आकारून त्या गरीब झोपडपट्टीतील मुलांमध्ये शिक्षणाची जागृती करत आहेत. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतः लोकांची मदत घेत आहेत. आज जाणून घेऊयात शिक्षिकेचे कौतुकास्पद कार्य. (राधिका कोडवानी/इंदूर, प्रतिनिधी)
advertisement
1/9
photos : गरिबांच्या मुलांच्या पंखांना दिलं बळ, शिक्षिकेच्या कौतुकास्पद कार्य...
सुनीता दीक्षित असे या शिक्षिकेचे नाव आहे. लोकल18 च्यी टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 2003-04 मध्ये मी पाहिले की गरीब, असहाय, रस्त्यावर भाजीचे स्टॉल चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. म्हणून मग मी त्यांना शिकवण्याची मोहीम सुरू केली. प्रत्येक घरात शिक्षण पोहोचावे, माझे हे ध्येय एकच होते.
advertisement
2/9
झोपडपट्ट्यांमध्ये वयाच्या 12-13 व्या वर्षी त्यांचे लग्न होऊ जायचे. अशा परिस्थितीत या मुलांच्या पालकांना पटवून देणे हे आव्हान होते. मात्र, सुनिता दीक्षित यांचे पती विष्णूप्रसाद दीक्षित यांनी घरोघरी जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
advertisement
3/9
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने श्री वाम शिशु विहार येथून शाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीला दरमहा 30 रुपये फी होती.
advertisement
4/9
त्या काळात 50 मुले यायची. प्रत्येक वर्षी 10 रुपये वाढवण्यात आले आणि कोरोनापूर्वी 60 रुपये फी घेतली जात होती. आता दरमहा 130 रुपये फी घेतली जात आहे.
advertisement
5/9
या शाळेत नर्सरी ते आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. एमपी बोर्डाने मान्यता दिलेल्या या शाळेत सध्या 300 विद्यार्थी शिक्षण घेतात.
advertisement
6/9
ज्या मुलांना फी भरता येत नाही, त्यांच्यासाठी समाजातील काही लोक येऊन मदत करतात. या बहुतेक मुलांचे पालक हे कामगार वर्गातील आहेत. ते आपल्या मुलांना मजूर म्हणून आपल्या सोबत कामावर ठेवतात. त्यांनाही शिक्षणाशीही जोडायचे आहे.
advertisement
7/9
शाळेत संसाधने कमी आहेत, पण स्वप्ने मोठी आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळा दोन खोल्यांनी सुरू झाली होती. आता याठिकाणी 12 खोल्या आहेत.
advertisement
8/9
शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांची दर तीन महिन्यांनी मोफत आरोग्य तपासणी केली जाते. शहरातील अनेक समाजसेवक डॉक्टरांकडून मुलांची तपासणी केली जाते. कुपोषण आणि अशक्तपणा हे लहान मुलांमध्ये सर्वात जास्त दिसून येते.
advertisement
9/9
सध्या चंपांजली फाउंडेशनने याठिकाणी सूक्ष्म आहार प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे ते दररोज सकाळी 10.15 वाजता मुलांसाठी नाश्ता घेऊन येतात. त्यात कधी गूळ, हरभरा, कधी फळे घेऊन येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
photos : गरिबांच्या मुलांच्या पंखांना दिलं बळ, शिक्षिकेच्या कौतुकास्पद कार्याची प्रेरणादायी गोष्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल