TRENDING:

success story : देशसेवेची जिद्द, पोरानं नाव कमावलं!, आधी पोलीस अधिकारी तर आता बनला...

Last Updated:
बिहार राज्यातील सीवानच्या गुठनी बाजार येथील रहिवासी असलेल्या बृजभान यांचा मुलगा अंकेश कुमार याची हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. अंकेश कुमार याने संपूर्ण भारतात 78 वी रँक मिळवली आहे.
advertisement
1/5
success story : देशसेवेची जिद्द, पोरानं नाव कमावलं!, आधी पोलीस अधिकारी तर आता...
अंकेश कुमार या तरुणाची कहाणी प्रेरणादायी आहे. आधी तो उपनिरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर झाला आणि आता हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे.
advertisement
2/5
अंकेशला दोन बहिणी तर दोन भाऊ आहेत. दोन्ही भावांमध्ये अंकेश मोठा आहे. आधी पीएसआय आणि आता फ्लाइंग ऑफिसरपदी निवड झाल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबीयात आनंदाचे वातावरण आहे.
advertisement
3/5
अंकेश कुमार या तरुणाने सीवानच्या गुठनी येथील माडर्न मिशन पब्लिक स्कूल येथून दहावी तसेच आदर्श विकास विद्यालय येथून बारावीचे शिक्षण घेतले. यानंतर 2016 मध्ये जेईईची परीक्षा दिल्यावर 2020 मध्ये त्याने बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. बीटेक पासआउट झाल्यावर अंकेशने हवाई दलात जायची तयारी सुरू केली. त्याने 5 ऑगस्ट 2023 रोजी हवाई दलाची परीक्षा दिली होती. आता त्याचा निकाल आला आहे.
advertisement
4/5
अंकेश कुमारचे वडील सध्या गोपालगंज येथील हथुआ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या वडिलांना पोलीस अधिकारी पाहून त्यानेही पोलीस अधिकारी बनण्याची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो पीएसआय झाला. यानंतर पुन्हा त्याने हवाई दलात जाण्याचे प्रयत्न केले असता त्याठिकाणीही पहिल्याच प्रयत्नात तो हे यश मिळवले.
advertisement
5/5
आता अंकेश कुमार हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर झाला आहे. त्याने सांगितले की, आपल्या ध्येयाप्रती सजग आणि एकाग्र राहून कठीण परिश्रम केले तर यश नक्कीच मिळते. माझ्या या यशामागे माझ्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे, असे त्याने लोकल18 शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
success story : देशसेवेची जिद्द, पोरानं नाव कमावलं!, आधी पोलीस अधिकारी तर आता बनला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल