TRENDING:

पायाभूत शिक्षणाच्या संकल्पातून उभारली संस्था, 50 हजार विद्यार्थी झाले प्रगत PHOTOS

Last Updated:
या संस्थेचा मुख्य उद्देश हा अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करणे हा आहे. संस्थेची स्थापना झाल्यानंतर उद्देशांमध्ये आणि उपक्रमांमध्ये भर पडत गेली.
advertisement
1/7
पायाभूत शिक्षणाच्या संकल्पातून उभारली संस्था, 50 हजार विद्यार्थी झाले प्रगत
आज घडीला आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. मात्र असं असताना देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा पाया हा मजबूत नसल्याचे असरच्या सर्वेक्षणातून अनेकदा पुढे आला आहे. हीच बाब हेरून <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहरातील काही लोकांनी पुढाकार घेत 2010 मध्ये जालना एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली. आज घडीला या संस्थेने तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांना प्रगत केले असून मागील तीन वर्षांमध्ये 600 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.
advertisement
2/7
या संस्थेचा मुख्य उद्देश हा अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करणे हा आहे. संस्थेची स्थापना झाल्यानंतर उद्देशांमध्ये आणि उपक्रमांमध्ये भर पडत गेली. तसेच गरजू विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग आणि शब्दांची डिक्शनरी वाढण्यासाठी शब्द डिक्शनरी अशी वेगवेगळे उपक्रम जेइएफ जालना शहरात आणि जिल्ह्यात राबवत असते. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जावी. एका सामान्य अभ्यासिकेपासून याची सुरुवात झाली आणि हळूहळू एक एक उपक्रम यामध्ये वाढत गेला, असं संस्थापक अध्यक्ष सुहास लाहोटी सांगतात.
advertisement
3/7
आज आमचे प्रमुख चार उपक्रम सुरू आहेत. पायाभूत शिक्षण हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम वही को सीड्स आणि जालना रोटरी क्लब यांच्या माध्यमातून चालवला जातो. या उपक्रमात प्रामुख्याने आम्ही ज्या विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान नाही त्यांना प्रगत करण्याचे काम करतो.
advertisement
4/7
त्यासाठी आम्ही मराठी, गणित आणि इंग्लिश अशी तीन पुस्तके तयार केली आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा एक अभ्यासक्रम देखील तयार केला आहे. सहा महिने दररोज एक तास या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यासाठी दर महिन्याला एक परीक्षा घेतली जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे काम या संस्थेने केले, असेही लाहोटी सांगतात.
advertisement
5/7
संस्थेकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत दिली जाते. ही मदत विद्यार्थी करत असलेल्या शिक्षणावर किंवा कोर्स वर डिपेंड करते. 15 हजारापासून ते तीस हजारापर्यंत आर्थिक मदत विद्यार्थ्यांना केली जाते. 2023-24 या एका वर्षामध्ये तब्बल 271 विद्यार्थ्यांना जेईएफने शिष्यवृत्ती दिली आहे. तर मागील तीन वर्षांमध्ये 600 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
advertisement
6/7
या संस्थेचा तिसरा उपक्रम मोफत कोचिंग देण्याचा आहे. सातवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना इथे मोफत कोचिंग दिले जाते. तसेच अकरावी बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील मोफत ट्युशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर चौथ्या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची शब्दसाठा वाढवा यासाठी 2 हजार मराठी इंग्लिश शब्दांची डिक्शनरी तयार करण्यात आली आहे.
advertisement
7/7
वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जालना एज्युकेशन फाउंडेशन जिल्ह्यात भरीव काम करत आहे आणि असंच काम इतर जिल्ह्यांमध्ये देखील व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं संस्थापक अध्यक्ष सुरेश लाहोटी यांनी सांगितलं. ही संस्था सुरू करण्याची कल्पना आणि यामध्ये महत्त्वाचे योगदान हे उद्योजक सुनील रायठट्टा आणि पत्रकार सुरेश केसापूरकर यांचे देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
पायाभूत शिक्षणाच्या संकल्पातून उभारली संस्था, 50 हजार विद्यार्थी झाले प्रगत PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल