success story : घरात टीव्ही नाही, सोशल मीडियापासूनही राहिला लांब, आता राज्यात आला टॉपर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
घरची आर्थिक परिस्थिती साधारण असली, पण शिस्तबद्ध पद्धतीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते, हे एका लोहाराच्या मुलाने सिद्ध करुन दाखवले आहे. जाणून घेऊयात या मुलाची संघर्षमय कहाणी. (अंजली शर्मा/कन्नौज, प्रतिनिधी)
advertisement
1/7

अनिकेत शर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत 97.20 टक्के मिळवले आहे. उत्तरप्रदेशच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. यामध्ये अनिकेतने हे यश मिळवले.
advertisement
2/7
अनिकेत हा तिर्वा येथील सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजचा विद्यार्थी आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशात त्याने दहावीच्या परिक्षेत तिसरा क्रमांक मिळवला होता. तर आता बारावीच्या परीक्षेत त्याने चौथा क्रमांक मिळवला आहे.
advertisement
3/7
अनिकेतने सांगितले की, त्याला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. शिक्षणाबाबत त्याचा विचार वेगळा आहे. त्याला मोठा अधिकारी झाल्यावर शाळा आणि कॉलेजचे काही विषय आहेत, त्यामध्ये बदल करायचे आहेत.
advertisement
4/7
अनिकेत दररोज 5 ते 6 तास अभ्यास करायचा. तसेच सोशल मीडिया आणि स्मार्टफोनपासून ते खूप दूर राहिला. त्याच्या घरात टीव्हीसुद्धा नाही. त्याचे वडील लोहाराचे काम करतात.
advertisement
5/7
अनिकेतला मेहनतीने भविष्यात आयएएस होऊन देशाची सेवा करायची आहे. माझ्या या यशामागे माझे गुरू आणि माझ्या आई वडिलांची कठोर मेहनत आहेत, असे तो म्हणाला.
advertisement
6/7
तर सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजचे प्राचार्य अनिल कुमार मिश्र यांनी सांगितले की, त्यांच्या कॉलेजचा निकाल चांगला आहे. उत्तरप्रदेशात 16 मुले टॉप 10 मध्ये त्यांच्या विद्यालयाचे आहेत. यामध्ये 9 विद्यार्थी दहावीचे तर 7 विद्यार्थी हे बारावीचे आहेत.
advertisement
7/7
ज्या पद्धतीने आमच्या इथे शिक्षण दिले जाते, ते पाहून आनंद होतो, असे ते म्हणाले. जर कुणी आर्थिक परिस्थितीने कमकुवत असेल तर त्यालाही मदत केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
success story : घरात टीव्ही नाही, सोशल मीडियापासूनही राहिला लांब, आता राज्यात आला टॉपर