UPSC Result : टेम्पो चालवला, भिकाऱ्यांसोबत झोपला, मैत्रिणीच्या या अटीमुळे बनला 'IPS अधिकारी'
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा - 2023 चा निकाल जाहीर केला. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) साठी 1016 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 180 IAS आणि 200 IPS अधिकारी होतील. यात काही विद्यार्थी यशस्वी झाले तर काही अयशस्वी. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विद्यार्थ्याची संघर्षकथा सांगणार आहोत.
advertisement
1/6

अपयशी झाल्यानंतरही प्रयत्न सोडू नये. त्यानंतर यश मिळतेच. हे सिद्ध करणारी कथा ते आहे, IPS मनोज कुमार शर्मा यांची. मनोज शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लहानपणापासून ते अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या कुटुंबात त्यांचे पालनपोषणही झाले. मात्र देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची मान उंचावली.
advertisement
2/6
लाखो लोकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. पण प्रत्येकजण त्यात यशस्वी होतोच असे नाही. आयपीएस मनोज कुमार शर्मा यांनी आयुष्यातील प्रत्येक अडचणींचा सामना करून यशाची शिखरे गाठली आहेत. त्यांची यशोगाथा कोणालाही प्रेरणा देण्यासाठी पुरेशी आहे. त्यांची जीवनकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
advertisement
3/6
बारावीत झाले नापास : आयपीएस मनोज कुमार शर्मा हे सरासरी विद्यार्थी राहिले आहेत. ते बारावीत हिंदी सोडून इतर सर्व विषयांत नापास झाले होते. त्यांना 9वी आणि 10वी मध्येही तिसरी डिव्हिजन मिळाली. लहानपणापासून या अपयशानंतरही मनोजने हार मानली नाही. लेखक अनुराग पाठक यांनी त्यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकात मनोज कुमार शर्मा यांचे चरित्र लिहिले आहे.
advertisement
4/6
भिकाऱ्यांसोबत झोपले : IPS मनोज कुमार शर्मा किती गरिबीत वाढले असतील, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी टेम्पोही चालवला. अनेकवेळा ते रात्री भिकाऱ्यांमध्ये रस्त्यावर झोपले. दिल्लीतील ग्रंथालयात काम करत असताना त्यांनी गॉर्की आणि अब्राहम लिंकनपासून मुक्तबोधापर्यंत अनेक प्रसिद्ध लोकांबद्दल वाचन केले. या पुस्तकांतून त्यांना जीवनातील खरे पैलू समजले.
advertisement
5/6
मैत्रिणीला वचन दिले : बारावीत शिकत असताना मनोज प्रेमात पडला. बारावीत नापास झाल्यामुळे प्रेम व्यक्त करायला लाज वाटली. शेवटी त्यांनी मैत्रिणींसमोर असा प्रस्ताव मांडला की, 'जर तू हो म्हणाली तर मी संपूर्ण जग बदलवून टाकेन'. UPSC तयारी दरम्यान मनोज यांची भेट श्रद्धा यांच्याशी झाली. त्यांनी मनोज यांना खूप पाठिंबा दिला. आता त्या मनोज शर्माच्या पत्नी आहेत.
advertisement
6/6
चौथ्या प्रयत्नात यशस्वी : मनोज कुमार शर्मा यूपीएससी परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून ते आयपीएस अधिकारी बनला. मनोज शर्मा हे सध्या मुंबई पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष कोणालाही अपयशातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
UPSC Result : टेम्पो चालवला, भिकाऱ्यांसोबत झोपला, मैत्रिणीच्या या अटीमुळे बनला 'IPS अधिकारी'