19 भाषा, 10 हजार गाणी, 3 राष्ट्रीय पुरस्कार! एकेकाळी लता दीदींच्या स्टारडमला दिलेला धक्का, सुप्रसिद्ध गायिकेचा राहत्या घरी झालेला दुर्दैवी अंत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अशा एका दिग्गज गायिका होत्या, ज्यांनी आपल्या आवाजाची जादू १० हजार गाण्यांमधून दाखवून दिली, पण तरीही त्यांचं आयुष्य एक रहस्य बनून राहिलं.
advertisement
1/11

भारतीय सिनेसृष्टीतील सुरांच्या दुनियेत अनेक दिग्गज आले आणि गेले, पण काही नावं अशी होती ज्यांनी यश तर अफाट मिळवलं, पण प्रसिद्धीच्या शिखरावर त्यांना जे स्थान मिळायला हवं होतं, ते मात्र हुकलं.
advertisement
2/11
अशाच एका दिग्गज गायिका होत्या, ज्यांनी आपल्या आवाजाची जादू १० हजार गाण्यांमधून दाखवून दिली, पण तरीही त्यांचं आयुष्य एक रहस्य बनून राहिलं. त्या स्वरसम्राज्ञी म्हणजे वाणी जयराम.
advertisement
3/11
३० नोव्हेंबर १९४५ रोजी तामिळनाडूतील वेल्लोर येथे जन्मलेल्या वाणी यांचे बालपण सुरांच्या सानिध्यातच गेले. घरची परिस्थिती बेताची असली तरी संगीताची ओढ मोठी होती. मद्रास विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी चक्क चेन्नई आणि हैदराबादच्या भारतीय स्टेट बँकेत नोकरी केली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
advertisement
4/11
१९६९ मध्ये त्यांची भेट संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. वसंत देसाई त्यावेळी दिग्गज गायक कुमार गंधर्व यांच्यासोबत एका मराठी अल्बमवर काम करत होते. वाणी यांचा आवाज ऐकताच देसाईंनी त्यांना कुमारजींसोबत "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..." हे गाणं गाण्याची संधी दिली. हे गाणं आजही प्रत्येक मराठी घराघरात ऐकू येतं.
advertisement
5/11
१९७१ मध्ये ऋषिकेश मुखर्जींच्या 'गुड्डी' चित्रपटातील "बोले रे पपीहरा" या गाण्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. वाणी जयराम रातोरात स्टार बनल्या. त्यांनी 'पाकीजा', 'आशीर्वाद' आणि 'पिकनिक' सारख्या चित्रपटांतून आपल्या आवाजाची छाप सोडली.
advertisement
6/11
असं म्हटलं जातं की, त्यांच्या आवाजाची रेंज इतकी अफाट होती की एका टप्प्यावर त्यांची तुलना साक्षात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याशी होऊ लागली होती.
advertisement
7/11
मात्र, बॉलीवूडच्या काही अंतर्गत राजकारणामुळे त्यांना अनेक चित्रपटांतून डावलण्यात आलं. ज्या स्थानावर त्या पोहोचू शकल्या असत्या, तिथून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आजही सिनेसृष्टीत रंगते. अखेर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला.
advertisement
8/11
हिंदी सिनेसृष्टीने जरी त्यांना डावललं असलं तरी दक्षिण भारताने त्यांना डोक्यावर घेतलं. इलैयाराजा आणि एम.एस. विश्वनाथन यांच्यासारख्या महान संगीतकारांसोबत त्यांनी हजारो गाणी गायली.
advertisement
9/11
तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये त्यांनी आपला दरारा निर्माण केला. त्यांनी तब्बल ३ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले.
advertisement
10/11
वाणी जयराम यांचं वैयक्तिक आयुष्यही संघर्षाचं होतं. पती जयराम यांनी त्यांना संगीतासाठी कायम पाठबळ दिलं, पण २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. वाणी चेन्नईच्या अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या.
advertisement
11/11
२६ जानेवारी २०२३ रोजी भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' जाहीर केला. पण, सन्मान स्वीकारण्यापूर्वीच ४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या कपाळावर जखमेचे निशाण होते, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
19 भाषा, 10 हजार गाणी, 3 राष्ट्रीय पुरस्कार! एकेकाळी लता दीदींच्या स्टारडमला दिलेला धक्का, सुप्रसिद्ध गायिकेचा राहत्या घरी झालेला दुर्दैवी अंत