Ashish Vidyarthi Accident : अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, रस्त्यात बाइकने उडवलं; पत्नीच्या डोक्याला जबर मार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ashish Vidyarthi Accident : बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीचा रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. नेमकं काय घडलं?
advertisement
1/8

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड तसंच साऊथ अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात झाला आहे. त्यांना दुचाकीस्वारानं धडक दिली. अपघात झाला तेव्हा त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती.
advertisement
2/8
अपघातात आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ दोघेही जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत. नेमकं अपघात कुठे आणि कसा झाला? पाहूयात.
advertisement
3/8
अभिनेते आशीष विद्यार्थी हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. रात्री पत्नी रूपाली बरुआ यांच्यासोबत रस्त्यावर फेरफटका मारत असताना अपघात झाला. दुचाकीस्वाराने अचानक धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
4/8
या अपघातात आशीष विद्यार्थी यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर त्यांची पत्नी रूपाली बरुआ यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
5/8
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, रुपाली यांची दुसरी MIR तपासणी करण्यात आली असून ही दुखापत गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. हा अपघात एका स्थानिक हॉटेलसमोर घडला. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एका तरुण दुचाकीस्वाराने दोघांनाही धडक दिली.
advertisement
6/8
अपघातात दुचाकीस्वारालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
7/8
आशिष विद्यार्थी यांची पत्नी रूपाली बरुआ या मूळच्या गुवाहाटी, आसाम येथील आहेत. रुपाली या आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी आहे. त्यांचं पहिलं लग्न पीलू राजोशी यांच्याबरोबर झालं होतं. 2022 साली त्यांनी डिवोर्स घेतला. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केलं. रुपाली बरुआ या आसामिया फॅशन डिझाइनर आहेत.
advertisement
8/8
आशिष विद्यार्थी अभिनयाबरोबरच युट्यूबरही सक्रीय आहेत. ते प्रचंड फूडी असून त्यांची खाद्यभ्रमंती ते युट्यूब व्हिडीओमधून चाहत्यांना दाखवत असतात. युट्यूबरवर त्यांचे 24 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ashish Vidyarthi Accident : अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, रस्त्यात बाइकने उडवलं; पत्नीच्या डोक्याला जबर मार