TRENDING:

Actor Life: डेब्यू सिनेमातून रात्रीत झाला स्टार, स्टारडम धोक्यात येताच बनला बिझनेसमन; अभिनेता आज कोट्यवधींचा मालक

Last Updated:
Actor Life: बॉलिवूडमध्ये आपल्या रोमँटिक आणि दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता. ज्याने डेब्यू सिनेमातून खळबळ उडवली. मात्र अनेक वाद, फ्लॉपचा शिक्का यांमुळे तो बॉलिवूडमधून नाहीसा झाला. आज तो एक यशस्वी बिझनेसमन आहे.
advertisement
1/7
डेब्यू सिनेमातून रात्रीत झाला स्टार, स्टारडम धोक्यात येताच बनला बिझनेसमन
बॉलिवूडमध्ये आपल्या रोमँटिक आणि दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता. ज्याने डेब्यू सिनेमातून खळबळ उडवली. मात्र अनेक वाद, फ्लॉपचा शिक्का यांमुळे तो बॉलिवूडमधून नाहीसा झाला. आज तो एक यशस्वी बिझनेसमन आहे.
advertisement
2/7
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे. 2002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी चित्रपटातून पडद्यावर दाखल झालेला विवेक एका क्षणातच स्टार झाला.
advertisement
3/7
पदार्पणातच त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार मिळाला. त्यानंतर साथिया, युवा, ओमकारा, शूटआउट अॅट लोखंडवाला यांसारख्या चित्रपटांनी त्याचं नाव मोठ्या अभिनेत्यांच्या रांगेत नेऊन ठेवलं.
advertisement
4/7
मात्र याच काळात काही चुकीचे निर्णय, काही फ्लॉप चित्रपट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या राय–सलमान खान वादामुळे त्याच्या करिअरला मोठा धक्का बसला. उद्योगातल्या अनेक मोठ्या निर्मात्यांनी त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली.
advertisement
5/7
करिअरला लागलेला हा उतार पचवणं सोपं नव्हतं. पण विवेकने हार मानली नाही. रक्त चरित्र सारख्या प्रखर भूमिकांमध्ये त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. हळूहळू अभिनयासोबत त्याने व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज तो रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि इतर प्रकल्पांमध्ये कोट्यवधींचा मालक आहे. 1200 कोटांचा तो मालक आहे.
advertisement
6/7
वैयक्तिक आयुष्यात विवेक 2010 मध्ये प्रियांका अल्वाशी विवाहबंधनात अडकला. प्रियांका एका प्रभावी व्यावसायिक घराण्यातील असून तिने नेहमीच विवेकला पाठबळ दिलं. या दाम्पत्याला दोन गोंडस अपत्यं आहेत मुलगा विवान आणि मुलगी अमेया.
advertisement
7/7
आज विवेक ओबेरॉयकडे पाहिलं तर तो केवळ अभिनेता नसून यशस्वी व्यावसायिक, प्रेमळ पती आणि जबाबदार पिता म्हणूनही ओळखला जातो. पडद्यावरचा त्याचा प्रवास कधी तेजस्वी, कधी खडतर होता, पण प्रत्येक टप्प्यावर त्याने नव्यानं उभं राहण्याचं धाडस दाखवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actor Life: डेब्यू सिनेमातून रात्रीत झाला स्टार, स्टारडम धोक्यात येताच बनला बिझनेसमन; अभिनेता आज कोट्यवधींचा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल