TRENDING:

Mrunal Dhanush : आज हळद, उद्या संगीत आणि...! Valentine Day ला काही तास शिल्लक, अन् अखेर मृणाल ठाकूरने दिलं आमंत्रण; धनुषसोबत करणार लग्न?

Last Updated:
Mrunal Thakur Dhanush Wedding : मृणाल ठाकूर धनुषसोबत वॅलेंटाईन डेला लग्न करणार असल्याची चर्चा होत होती. वॅलेंटाईन डेला काही तास शिल्लक असताना अखेर मृणालने स्वत:च आमंत्रण दिलं आहे.
advertisement
1/5
आज हळद, उद्या संगीत आणि...! अखेर मृणालने धनुषसोबत लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि साऊथ सुपरस्टार धनुष 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी लग्न करणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू आहे. आता मृणालने स्वत: यावर भाष्य केलं आहे.
advertisement
2/5
इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने धनुषसोबतच्या लग्नाबाबत सांगितलं.  जेव्हा तिला सांगितलं गेलं की तिच्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर आधीच निश्चित झाली आहे, तेव्हा मृणाल म्हणाली, "अरे मित्रांनो, आज माझा हळदी समारंभ आहे, उद्या संगीत आहे. तुम्ही सर्वांनी जेवून जा", असं म्हणत तिने आमंत्रण दिलं.
advertisement
3/5
तिच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. तिने स्पष्ट केले की या फक्त अफवा आहेत. तिचं लग्न कधी होणार आहे हे तिला स्वतःला माहित नाही.
advertisement
4/5
यावेळी तिचा 'दो दीवाने शहर में' मधील सह-कलाकार अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनेही म्हटलं की, लोकांनी 14 फेब्रुवारी रोजी मृणालच्या घराबाहेर रांगेत उभं राहावं. यावर मृणाल म्हणाली, हा एप्रिल फूलचा सर्वात मोठा विनोद असेल.
advertisement
5/5
मृणाल लग्नाबद्दल म्हणाली की, फक्त लग्न करण्यासाठी लग्न करू नये. योग्य, विश्वासू व्यक्ती शोधणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तिला योग्य जोडीदार मिळेल आणि योग्य वेळ येईल तेव्हाच ती लग्नाचा निर्णय घेईल. तिने लग्न केलं तर ती ते लपवणार नाही, ती स्वतः सर्वांना सांगेन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mrunal Dhanush : आज हळद, उद्या संगीत आणि...! Valentine Day ला काही तास शिल्लक, अन् अखेर मृणाल ठाकूरने दिलं आमंत्रण; धनुषसोबत करणार लग्न?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल