व्हॅलेंटाईन वीकमध्ये शेतकऱ्यांचा सुपर फंडा! फक्त ५० पैसे खर्च करून विकताय लाखोंचा गुलाब, नेमकं करताय काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik News : दिंडोरी, निफाड आणि नाशिक परिसरातील गुलाब शेती सध्या पूर्ण बहरात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतात पहाटे कापणीला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत गुलाबांचे गठ्ठे तयार करून ते बाजारपेठेकडे रवाना केले जातात.
advertisement
1/7

नाशिक : दिंडोरी, निफाड आणि नाशिक परिसरातील गुलाब शेती सध्या पूर्ण बहरात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतात पहाटे कापणीला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत गुलाबांचे गठ्ठे तयार करून ते बाजारपेठेकडे रवाना केले जातात. कारण व्हॅलेंटाईन डे जवळ येत असताना प्रत्येक तास महत्त्वाचा ठरतो. वेळेत माल पोहोचला तरच चांगला दर मिळतो, हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.
advertisement
2/7
५० लाख गुलाब उत्तर भारताकडे रवाना - यंदा दिंडोरी आणि निफाड पट्ट्यातून सुमारे ५० लाख गुलाब दिल्ली, कोलकाता आणि इतर उत्तर भारतीय शहरांकडे पाठवण्यात आले आहेत. लाल गुलाबांना सर्वाधिक मागणी असली तरी गुलाबी, पिवळे आणि पांढरे गुलाबही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यात फुलबाजारात दर चांगले मिळत असल्याने शेतकरीही या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात.
advertisement
3/7
वाहतूक खर्च कमी, नफा जास्त - गुलाब हा अत्यंत नाशवंत माल असल्याने त्याची वाहतूक जलद आणि कमी खर्चात होणे आवश्यक असते. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार ६०० गुलाबांचा एक गठ्ठा रेल्वेमार्गे पाठवण्यासाठी सुमारे ३०० रुपये खर्च येतो. म्हणजेच एका गुलाबामागे जवळपास ५० पैसे वाहतूक खर्च पडतो.
advertisement
4/7
व्हॅलेंटाईन आठवड्यात एका गुलाबाला सरासरी २० रुपये दर मिळत असताना हा वाहतूक खर्च तुलनेने अत्यंत कमी ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात नफ्याचा मोठा हिस्सा राहतो. “रेल्वेमुळे माल वेळेत आणि स्वस्तात पोहोचतो. त्यामुळे आमचा फायदा वाढतो,” असे एका शेतकऱ्याने सांगितले.
advertisement
5/7
१० कोटींच्या उलाढालीची शक्यता - ५० लाख गुलाबांची विक्री झाली तर अंदाजे १० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. त्यातील एकूण वाहतूक खर्च साधारण २५ लाखांच्या आसपास राहतो. उर्वरित रक्कमेतून उत्पादन खर्च वजा केला तरी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा हंगाम वर्षातील महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो.
advertisement
6/7
रेल्वेमुळे दूरच्या बाजारपेठा खुल्या - पूर्वी दूरच्या बाजारात माल पाठवताना वेळ आणि खर्च ही मोठी अडचण होती. आता रेल्वे वाहतुकीमुळे दिल्ली, कोलकाता यांसारख्या शहरांत गुलाब मोठ्या प्रमाणावर आणि तुलनेने कमी खर्चात पोहोचत आहेत. वेळेत माल पोहोचल्याने ताजेपणा टिकून राहतो आणि व्यापाऱ्यांनाही नियोजन सुलभ होते. फुलांच्या बाजारात ताजेपणा हा दर ठरवणारा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे वेळेवर पोहोचणाऱ्या गुलाबांना चांगला भाव मिळतो.
advertisement
7/7
प्रेमासोबत अर्थकारणाचा हंगाम - व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कमाईचा सुवर्णकाळ आहे. शेतातून निघालेला प्रत्येक गुलाब शेकडो किलोमीटरचा प्रवास करून प्रेमाचा संदेश देतो आणि त्याच वेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
व्हॅलेंटाईन वीकमध्ये शेतकऱ्यांचा सुपर फंडा! फक्त ५० पैसे खर्च करून विकताय लाखोंचा गुलाब, नेमकं करताय काय?