विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, लग्नाशिवाय गरोदर, मग थाटला नवा संसार; आज 2 स्टार मुलींची आई
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Love story: अभिनयाच्या सुरुवातीपासून हा अभिनेता केवळ त्याच्या स्टारडममुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत राहिला.
advertisement
1/7

कमल हसन यांनी केवळ साऊथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वयाच्या 70व्या वर्षीही तो आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवत आहे. अभिनयाच्या सुरुवातीपासून हा अभिनेता केवळ त्याच्या स्टारडममुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत राहिला.
advertisement
2/7
कमल हसनची पहिली पत्नी वाणी गणपतीशी लग्न करूनही तो अभिनेत्री सारिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता हे सर्वांनाच माहीत आहे. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं होतं की अभिनेत्री लग्न न करताच प्रेग्नंट राहिली. पण जेव्हा सारिका कमल हसनच्या मुलाची आई झाली आणि तिने मुलाला ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झालं.
advertisement
3/7
अभिनेत्री सारिकाने सिमी ग्रेवालसोबतच्या शोमध्ये खुलासा केला होता की, कमल हसनसोबत लग्न केलं होतं. तो तिच्या प्रेमात पडला होता पण त्यावेळी ती या नात्याबद्दल खूप संकोच करत होती. सारिकाला 'खलनायक' आणि 'दुसरी स्त्री' असं संबोधलं जात होतं. हे तिच्यासाठी अतिशय नकारात्मक वातावरण होते. कमल हसनसोबतचे नाते तोडण्यासाठी तिने अनेकदा प्रयत्नही केले, पण दोघांमधील बंध खूप घट्ट होते.
advertisement
4/7
विवाहबाह्य संबंधांमुळे वाणी गणपतीसोबतचे हासनचे लग्नही तुटलं होतं आणि यादरम्यान कमल हसनला समजले की सारिका आपल्या मुलाची आई होणार आहे. सारिकाने खुलासा केला की, त्यावेळी ती आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत होती. तिने शोमध्ये खुलासा केला की, 'मला वाटले की मी हासनला प्रेग्नेंसीबद्दल सांगावे.'
advertisement
5/7
सारिका म्हणते, 'मी त्यांना फक्त सांगत होते की मी तुमच्या मुलाला जन्म देणार आहे, एवढेच. मी त्याला माझ्याशी लग्न करण्यास, पत्नीला सोडण्यास किंवा माझ्यासोबत राहण्यास सांगितले नाही. मला वाटलं की मी त्याच्या मुलाला जन्म देणार आहे हे जाणून घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे आणि मी मुलाला ठेवण्याचा निर्णय घेतला कारण ती माझी गरज होती. जरी तो यास कोणत्याही प्रकारे जबाबदार नव्हता.
advertisement
6/7
मात्र, ही आनंदाची बातमी समजल्यानंतर कमल हसनने सारिकासोबत राहून वडील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लवकरच वाणी गणपतीला घटस्फोट दिला आणि 1988 मध्ये सारिकासोबत लग्न केले. त्यांची पहिली मुलगी श्रुती हासनचा जन्म 1986 मध्ये झाला होता आणि त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हासनचा जन्म 1991 मध्ये झाला होता. त्यांचं लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेतला.
advertisement
7/7
आता सारिका सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे आणि तिच्या दोन्ही मुली आपापल्या कामात व्यस्त आहेत, तर हासनही चित्रपटांमध्ये आपली छाप पाडत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, लग्नाशिवाय गरोदर, मग थाटला नवा संसार; आज 2 स्टार मुलींची आई