Cooking Rice : तुम्हीही कुकरला भात शिजवता का? मग ही गोष्टी तुम्हाला माहित असायलाच पाहिजे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का, की या घाईघाईत आपण आपल्या आरोग्याशी नकळत एक मोठी तडजोड करत आहोत? जुन्या काळी आपली आजी किंवा आई भात शिजवण्यापूर्वी तो अर्धा तास भिजत ठेवायची, त्यामागे केवळ परंपरा नव्हती तर एक मोठं विज्ञान होतं.
advertisement
1/9

आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे कशासाठी वेळ असेल किंवा नसेल, पण 'झटपट' कामं उरकण्यासाठी आपण नवनवीन तंत्रज्ञान मात्र नक्कीच शोधतो. सकाळी कामावर जाण्याची घाई असो किंवा रात्रीचा थकवा, आपण स्वयंपाकघरातही शॉर्टकट शोधू लागलो आहोत. फ्रिज, वॉशिंग मशीन आणि आता मायक्रोवेव्ह किंवा इलेक्ट्रिक राइस कुकर हे आपल्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनले आहेत.
advertisement
2/9
बटण दाबलं की 10 मिनिटांत वाफाळलेला भात तयार. दिसायला हे खूप सोपं आणि सोयीस्कर वाटतं, पण तुम्हाला माहीत आहे का, की या घाईघाईत आपण आपल्या आरोग्याशी नकळत एक मोठी तडजोड करत आहोत? जुन्या काळी आपली आजी किंवा आई भात शिजवण्यापूर्वी तो अर्धा तास भिजत ठेवायची, त्यामागे केवळ परंपरा नव्हती तर एक मोठं विज्ञान होतं.
advertisement
3/9
आजच्या पिढीने तांदूळ भिजवण्याची सवय जवळजवळ मोडीत काढली आहे. एकदा तांदूळ धुतला की तो थेट राइस कुकरमध्ये जातो. पण अन्न तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. तांदूळ न भिजवता शिजवल्याने आपण केवळ त्यातील पोषक तत्व गमावत नाही, तर शरीरात विषारी घटकही वाढवत आहोत.
advertisement
4/9
1. ग्लायसेमिक इंडेक्स आणि रक्तातील साखरतांदूळ भिजवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) नियंत्रित राहतो. जीआय म्हणजे एखादा पदार्थ तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढवतो याचं मोजमाप. तांदूळ आधी भिजवून मग शिजवला तर त्याचा जीआय स्तर कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. जे लोक मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी तर ही पद्धत संजीवनीच आहे.
advertisement
5/9
2. अन्नातील 'व्हिलन' म्हणजे फायटिक ॲसिडतांदळात नैसर्गिकरित्या फायटिक ॲसिड नावाचे घटक असतात. हे घटक शरीराला लोह (Iron), कॅल्शियम आणि झिंक यांसारखी महत्त्वाची खनिजे शोषून घेण्यापासून रोखतात. जेव्हा आपण तांदूळ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवतो, तेव्हा हे फायटिक ॲसिड कमी होते आणि तांदळातील खनिजे आपल्या शरीराला पूर्णपणे मिळतात.
advertisement
6/9
3. आर्सेनिकचा धोका टाळासंशोधनातून असं समोर आलं आहे की, भात शेतात असताना त्यात नैसर्गिकरित्या आर्सेनिकसारख्या जड धातूंचे अंश जमा होतात. जर तांदूळ न भिजवता शिजवला, तर हे विषारी घटक आपल्या पोटात जातात. पण तांदूळ नीट धुवून, थोडा वेळ भिजवून ते पाणी फेकून दिल्यास या विषारी घटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
advertisement
7/9
4. पचनासाठी हलका आणि 'पोषक' भाततांदूळ भिजवल्यामुळे त्यातील एन्झाईम्समध्ये बदल होतात. यामुळे तांदळातील जटिल कर्बोदके (Complex Carbohydrates) साध्या रूपात मोडली जातात, परिणामी असा भात पचायला अत्यंत हलका होतो. ज्यांना वारंवार अपचनाचा किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांनी तर तांदूळ भिजवल्याशिवाय कधीच शिजवू नये.
advertisement
8/9
तुम्ही भात मायक्रोवेव्हमध्ये बनवा किंवा इलेक्ट्रिक राइस कुकरमध्ये, पण शिजवण्यापूर्वी किमान 15 ते 30 मिनिटे तांदूळ स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. हे 15 मिनिटे तुमचे भविष्यकाळातील अनेक आजार टाळू शकतात.आकार गमावतो आणि त्याचा गोळा होतो.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Cooking Rice : तुम्हीही कुकरला भात शिजवता का? मग ही गोष्टी तुम्हाला माहित असायलाच पाहिजे