वयाच्या 24 व्या वर्षी झाली डॉक्टर, पदवीचा गाशा गुंडाळून बनली हिरोईन; सगळे म्हणतात नॅशनल क्रश!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
या 24 वर्षीय अभिनेत्रीकडे डॉक्टरेट पदवी आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये तिनं काम केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
advertisement
1/6

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रात झालं पण अभिनयाची आवड त्यांनी इंडस्ट्रीत घेऊन आली. अशीच एक अभिनेत्री जिला वयाच्या 24 व्या वर्षी डॉक्टरेट ही पदवी मिळाली. पण तिनं ती बाजूला सारली आणि अभिनेत्री बनली.
advertisement
2/6
आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलतोय ती अभिनेत्री श्रीलीलाने शिवकार्तिकेयन. हिनं 'परशक्ती' या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 24 वर्षीय तिनं डॉक्टरेट मिळवली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
3/6
अभिनेत्री श्रीलीलाने 2019 मध्ये कन्नड चित्रपट 'किस' द्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या "भारते" चित्रपटातही तिने काम केले. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बेली सांता" या चित्रपटातून तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
advertisement
4/6
रवी तेजा अभिनीत 'थमागा' चित्रपटातील श्रीलीलाच्या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटाने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. चित्रपटातील 'पल्सर बाइक' हे गाणे प्रचंड हिट झाले.
advertisement
5/6
2023 मध्ये, तिने 'भगवंत केसरी' या चित्रपटात बालकृष्णाच्या मुलीची भूमिका केली. त्यानंतर, महेश बाबूच्या "गुंटूर करम" या चित्रपटातील गाण्यातील तिच्या डान्सचं खूप कौतुक झालं. श्रीलीलाने अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2' या चित्रपटातील 'किस' या गाण्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. ती 'परशक्ती' या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. तिचे चाहते तिला तमिळ सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
6/6
श्री लीलाने अभिनयासोबत वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, तिच्या आजीच्या आग्रहावरून वैद्यकीय शिक्षण घेतले आहेय कारण तिची आई स्वर्णलता ही डॉक्टर आहे. तिने मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 24 व्या वर्षी झाली डॉक्टर, पदवीचा गाशा गुंडाळून बनली हिरोईन; सगळे म्हणतात नॅशनल क्रश!