बंदूकीच्या धाकावर निर्मात्याने मराठी अभिनेत्रीला केलं किडनॅप, तब्बल 3 महिन्यांनी बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली सुटका!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Entertainment Industry : या अभिनेत्रीला १९९५ साली राजस्थानमध्ये एका निर्मात्याने तीन महिने डांबून ठेवलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीने त्यांची सुटका झाली.
advertisement
1/7

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक अत्यंत हसतमुख, दिलखुलास आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पाठारे. आपल्या खास विनोदी अभिनयशैलीने आणि ठसकेबाज संवादफेकीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
advertisement
2/7
आज त्या आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र या यशस्वी टप्प्यापर्यंत पोहोचताना त्यांनी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. त्यातलाच एक प्रसंग, जो आजही थरकाप उडवणारा आहे.
advertisement
3/7
हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण सुप्रिया पाठारे यांनी स्वतः एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. ही गोष्ट आहे १९९५ सालाची. तेव्हा त्या एका राजस्थानी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये होत्या. त्यावेळी तिथल्या एका चित्रपट निर्मात्याने त्यांना चक्क तीन महिने एका खोलीत डांबून ठेवलं होतं.
advertisement
4/7
त्या दिवसांची आठवण सांगताना सुप्रिया म्हणाल्या, "त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अचानक एक दिवस मला एका खोलीत बंद केलं गेलं. मला बंदुकीचा धाक दाखवण्यात आला. मला कुठेही जाऊ दिलं नाही. केवळ घरच्यांशी बोलण्याची परवानगी होती, पण ती देखील फक्त हिंदीत. म्हणजे मी मराठीत काही बोलून मदत मागू नये, ही काळजी त्याने घेतली होती."
advertisement
5/7
पण अभिनयात जितकी ती कुशल, तितकीच ती हुशार! त्या बंदिस्त अवस्थेत देखील सुप्रियाने एका कॉलमध्ये त्यांच्या बहिणीला संकेत देत मदतीची मागणी केली. हे समजताच घरच्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.
advertisement
6/7
बाळासाहेबांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घातलं आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने सुप्रियाची सुटका केली गेली. ती रात्र सुप्रिया कधीच विसरणार नाही. २० तासांचा प्रवास करत त्या सुरतला पोहोचल्या, आणि तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १२ रुपये होते! आजही सुप्रिया त्या निर्मात्याचं नाव किंवा त्याने तसं का केलं, हे उघड करत नाहीत. "माझा उद्देश फक्त सुटणं होता," असं त्या म्हणतात.
advertisement
7/7
'फु बाई फु', 'जागो मोहन प्यारे', 'टाइमपास', 'चि. व चि. सौ. का' अशा अनेक लोकप्रिय कलाकृतींमध्ये आपल्या अभिनयाने जान आणणारी ही कलाकार, एकेकाळी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत होती. आज ती लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बंदूकीच्या धाकावर निर्मात्याने मराठी अभिनेत्रीला केलं किडनॅप, तब्बल 3 महिन्यांनी बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली सुटका!