White Tea Benefits : ना ब्लॅक, ना ग्रीन ट्रेंडिंग ठरतोय 'व्हाईट टी', तुम्ही प्यायला आहात का सफेद चहा? वाचा फायदे
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी आपल्या आरोग्यदायी फायद्यांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. पण, आता आरोग्य वर्तुळात व्हाईट टीचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. व्हाईट टी हा ग्रीन टी पेक्षाही अधिक पौष्टिक आणि कमी प्रक्रिया केलेला चहा मानला जातो.
advertisement
1/7

गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी आपल्या आरोग्यदायी फायद्यांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. पण, आता आरोग्य वर्तुळात व्हाईट टीचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. व्हाईट टी हा ग्रीन टी पेक्षाही अधिक पौष्टिक आणि कमी प्रक्रिया केलेला चहा मानला जातो. चला, जाणून घेऊया व्हाईट टी म्हणजे काय आणि तो आरोग्यासाठी का अधिक फायदेशीर आहे.
advertisement
2/7
व्हाईट टी म्हणजे काय?: व्हाईट टी हा चहाच्या पानांच्या झाडाच्या अगदी कोवळ्या आणि न उमललेल्या कळ्यांपासून बनवला जातो. हा चहा कमीत कमी प्रक्रिया करून तयार केला जातो, ज्यामुळे त्याचे नैसर्गिक गुणधर्म आणि पोषक तत्वे टिकून राहतात. कॅमेलिया वनस्पतीच्या नाजूक पानांपासून आणि त्यांच्या पांढऱ्या तंतूंपासून बनवलेला हा चहा हलका तपकिरी किंवा पांढरा रंगाचा असतो.
advertisement
3/7
अधिक अँटिऑक्सिडंट्स: व्हाईट टी मध्ये ग्रीन टी पेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
advertisement
4/7
त्वचेचे आरोग्य आणि वृद्धत्वविरोधी: अँटिऑक्सिडंट्समुळे व्हाईट टी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तो त्वचेवरील सुरकुत्या कमी करतो आणि चेहऱ्यावर चमक आणतो. त्यामुळे व्हाईट टीला एक नैसर्गिक अँटी-एजिंग पेय मानले जाते.
advertisement
5/7
वजन कमी करण्यास मदत: व्हाईट टी शरीराचा चयापचय दर वाढवतो आणि शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतो. नियमितपणे याचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
6/7
कमी कॅफिन: व्हाईट टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टीच्या तुलनेत कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे ज्यांना कॅफिनची ॲलर्जी आहे किंवा रात्रीच्या वेळी काही गरम प्यायचे असेल, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
7/7
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीराला विविध रोगांपासून लढण्यासाठी ताकद मिळते. जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल, तर व्हाईट टीला तुमच्या रोजच्या आहारात सामील करणे एक चांगला निर्णय ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
White Tea Benefits : ना ब्लॅक, ना ग्रीन ट्रेंडिंग ठरतोय 'व्हाईट टी', तुम्ही प्यायला आहात का सफेद चहा? वाचा फायदे