तोंडाला रुमाल, तुफान दगडफेक-जाळपोळ, लाठीचार्ज नेपाळमधील Gen Z Proetst चे अंगावर काटा आणणारे 10 PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नेपाळमध्ये जेन-झी क्रांतीमुळे सोशल मीडियावरील बंदी हटवली गेली. काठमांडूतील हिंसक आंदोलनात 20 मृत्युमुखी, 300 जखमी, गृहमंत्र्यांचा राजीनामा.
advertisement
1/10

नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोशल मीडियावरील बंदीविरोधातील आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. जेन-झी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण वर्गाच्या जोरदार आणि हिंसक आंदोलनामुळे नेपाळ सरकारला अखेर सोमवारी रात्री उशिरा आपली भूमिका मागे घ्यावी लागली.
advertisement
2/10
या आंदोलनामुळे 20 लोकांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. या मोठ्या किंमतीनंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी तात्काळ हटवली.काठमांडूमध्ये सोमवारी जेन-झी गटाने सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
advertisement
3/10
ही निदर्शने इतकी हिंसक झाली की, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांशी थेट संघर्ष केला. पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि गोळीबार करूनही आंदोलक मागे हटले नाहीत.
advertisement
4/10
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळच्या के.पी. शर्मा ओली सरकारने तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आणि बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/10
नेपाळचे दळणवळण, माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सांगितले की, सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया साईट्सवरील बंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. या साइट्सनी नोंदणी केली नसल्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
advertisement
6/10
या बंदीच्या विरोधात ‘जेन-झी’ गटातील तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. काठमांडूमधील संसदेच्या इमारतीतही काही आंदोलक घुसले, ज्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला.
advertisement
7/10
'काठमांडू पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, दमकमधील निदर्शकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक केली. संतप्त निदर्शकांनी टायर जाळून पूर्व-पश्चिम महामार्ग रोखला होता.
advertisement
8/10
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना इशारा म्हणून हवेत गोळीबार करावा लागला. सुरक्षा दलांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
advertisement
9/10
हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले.
advertisement
10/10
या आंदोलनाला ‘जेन-झी क्रांती’ म्हटले जात आहे, कारण यात तरुण आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सोशल मीडियावरील बंदी हे या आंदोलनाचे तात्काळ कारण असले तरी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांनीही या आंदोलनाला आणखी धार दिली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
तोंडाला रुमाल, तुफान दगडफेक-जाळपोळ, लाठीचार्ज नेपाळमधील Gen Z Proetst चे अंगावर काटा आणणारे 10 PHOTO