TRENDING:

Online Money Transfer : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना 'या' 5 गोष्टी नेहमी ठेवा, चूकीनही करु नका या गोष्टी, नाहीतर गमावाल मेहनतीचे पैसे

Last Updated:
जरासा निष्काळजीपणा तुमच्या मेहनतीचे पैसे बुडवू शकतो. त्यामुळे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन (Online Transaction) करताना काही गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे.
advertisement
1/7
Online Money पाठवताना 'या' 5 गोष्टी नेहमी ठेवा, नाहीतर गमावाल मेहनतीचे पैसे
आजच्या डिजिटल युगात (Digital India) ऑनलाइन मनी ट्रान्सफर (Online Money Transfer) हा लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. किराणा दुकानात छोटा पेमेंट असो किंवा मोठ्या व्यवसायातील व्यवहार (Business Transaction), सर्व काही आता मोबाईलच्या काही टॅपमध्ये होतं. शिवाय यामुळे सुट्टे पैशांची झंझट देखील संपली आहे. मात्र जिथं सुविधा आहे, तिथंच फसवणुकीचं सावटही आहे.
advertisement
2/7
जरासा निष्काळजीपणा तुमच्या मेहनतीचे पैसे बुडवू शकतो. त्यामुळे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन (Online Transaction) करताना काही गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. अशावेळी काय तपासावं किंवा कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
advertisement
3/7
1. गूगलवर नंबर तपासाजर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवत असाल, तर फसवणूक टाळण्यासाठी आधी त्या नंबरला गूगलवर सर्च करा. अनेकदा ठगांच्या नंबरबाबत लोकांनी गूगलवर रिव्ह्यू लिहिलेले असतात, जे तुमच्यासाठी सावधानतेचं काम करतात.
advertisement
4/7
2. UPI ऐवजी NEFT/IMPS वापरायूपीआय (UPI) व्यवहारात दुसऱ्या व्यक्तीची फारशी माहिती मिळत नाही. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना शक्य असल्यास NEFT किंवा IMPS पद्धत वापरा, कारण यात अतिरिक्त सुरक्षा मिळते आणि संबंधित व्यक्तीची ओळखही स्पष्ट होते.
advertisement
5/7
3. घाईगडबडीत पैसे पाठवू नकाघाईत पैसे ट्रान्सफर करू नका. एकदा पैसे चुकीच्या खात्यात गेले, तर परत मिळवणं अवघड असतं. त्यामुळे पैसे पाठवण्याआधी नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड नीट तपासा.
advertisement
6/7
4. आधी कमी रक्कम पाठवून तपासामोठी रक्कम पाठवण्याआधी एकदा 1–2 रुपये पाठवून तपासणी करा. जर व्यवहार योग्य रित्या पूर्ण झाला नाही, तर लगेच माहिती पुन्हा तपासा.
advertisement
7/7
5. चेकद्वारे पेमेंट कराअनोळखी कंपनीला पैसे द्यायचे असतील, तर शक्य असल्यास चेकने पेमेंट करा. चेक क्लिअर होण्याआधी बँकेकडून संपूर्ण तपासणी होते, त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Online Money Transfer : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना 'या' 5 गोष्टी नेहमी ठेवा, चूकीनही करु नका या गोष्टी, नाहीतर गमावाल मेहनतीचे पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल