TRENDING:

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला? मतदानातून 11 खासदारांची माघार, समोर आली अपडेट...

Last Updated:

Vice President Election : एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मतांमध्ये अंतर असले तरी क्रॉस वोटिंग होईल का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: देशाच्या 17व्या उपराष्ट्रपतीपदासाठीसाठी मतदान आज होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सरळ लढत आहे. संख्याबळाचा विचार करता एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जात आहे. तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी काही चमत्कार करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मतांमध्ये अंतर असले तरी क्रॉस वोटिंग होईल का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला? मतदानातून 11 खासदारांची माघार, समोर आली अपडेट...
उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला? मतदानातून 11 खासदारांची माघार, समोर आली अपडेट...
advertisement

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने निवडणूक होणार आहे. संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, मतमोजणी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी व एनडीएमध्ये कडवी टक्कर होणार असल्याचे म्हटले जात आहे. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने क्ऱॉस वोटिंगचा धास्ती दोन्ही आघाड्यांना आहे. या निवडणुकीत विरोधकांची मते फोडून आपल्याकडे अधिक संख्याबळ असल्याचं दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न भाजप-एनडीएकडून करण्यात येणार आहे. तर, सत्ताधारी गटातील काही मते खेचून एनडीएला धक्का देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असणार आहे.

advertisement

11 खासदारांची माघार...

एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये नसणाऱ्या काही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचे 11 खासदार आहेत. या दोन्ही पक्षांची माघार भाजपच्या फायद्यासाठी असणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठी बातम्या/देश/
Vice President Election : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला? मतदानातून 11 खासदारांची माघार, समोर आली अपडेट...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल