TRENDING:

Famous Bhaji Pohe : अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video

Last Updated:

याठिकाणी मिळणारे पोहे अतिशय टेस्टी असल्याचं खवय्यांकडून सांगण्यात येते. सकाळी 7 वाजतापासून याठिकाणी पोहे खाण्यासाठी गर्दी बघायला मिळते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. वरूड तालुक्यातील संत्र्याची चव इतर कुठे मिळणे शक्य नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण, इतरही अनेक पदार्थ असे आहेत ज्यांची चव कुठेही मिळणार नाही. त्यातीलच एक म्हणजे पांढुर्णा चौक येथील त्रिमूर्ती हॉटेल जवळील श्री यशवंत साई पोहा पॉइंट. याठिकाणी मिळणारे पोहे अतिशय टेस्टी असल्याचं खवय्यांकडून सांगण्यात येते. सकाळी 7 वाजतापासून याठिकाणी पोहे खाण्यासाठी गर्दी बघायला मिळते.
advertisement

दोन मित्रांनी सुरू केला व्यवसाय

श्री यशवंत साई पोहा पॉइंट हे दोन मित्रांनी सुरू केलेलं स्टॉल आहे. बंटी धरमठोक आणि कपिल कोचर दोघांनीही वेगवेगळे स्टॉल सुरू केले होते. नंतर कोरोना काळात त्यांनी दोघांचेही स्टॉल एक करून हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडील भजे पोहे अतिशय प्रसिद्ध आहेत.

Kelful Recipe : हिवाळ्यात शरिराला आरोग्यदायी, घरीच बनवा केळफुलाची भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video

advertisement

भजी पोह्यांसाठी प्रसिद्ध स्टॉल

त्यांच्याकडील पोहे हे विशेष आहेत. कारण पोह्यांसोबत देण्यासाठी ते बारीक भजी बनवतात. त्याचबरोबर तरीदार रस्सा देखील तयार करतात. अगदी बारीक भजी बनवून ती आधी प्लेटमध्ये द्यायची. त्यानंतर पोहे, त्यावर रस्सा, रस्यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि मिरची अशा पद्धतीने ते प्रत्येक ग्राहकाला पोहे बनवून देतात. ही पोह्यांची प्लेट 30 रुपयांनी ते विक्री करतात.

advertisement

दिवसाला 300 प्लेट पोह्यांची विक्री 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
सर्व पहा

दिवसाला 25 ते 30 किलो पोहे म्हणजेच 300 प्लेट पोह्यांची विक्री ते करतात. वरूड हे शहर मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असल्याने याठिकाणी दिवसभर प्रवाशांची गर्दी असते. आल्यानंतर सर्वात आधी नाश्ता करायचा म्हटलं तर सर्वजण पोह्यांना प्राधान्य देतात. ग्राहकांना बेस्ट पोहे आपल्याकडून मिळावे यासाठी दोघेही मित्र सकाळी 6.00 वाजतापासून मेहनत घेतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Bhaji Pohe : अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल