advertisement

Guava Ice Cream : उन्हाळ्यात बाहेरचे थंड-गोड पदार्थ खाणं सोडा, घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी पेरू आईस्क्रीम!

Last Updated:

Healthy and tasty guava Ice cream : आईस्क्रीम घरी बनवणंही खूप सोपं आहे. आज आम्ही तुम्हाला पेरू आईस्क्रीमची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. पाहूया पेरू आईस्क्रीम बनवण्याची पद्धत.

पेरू आईस्क्रीम बनवण्याची पद्धत..
पेरू आईस्क्रीम बनवण्याची पद्धत..
मुंबई : उन्हाळ्यात आपल्याला गोड आणि थंड पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. आपण मग आईस्क्रीम बाहेरून आणून खातो. पण खरं तर आईस्क्रीम घरी बनवणंही खूप सोपं आहे. आज आम्ही तुम्हाला पेरू आईस्क्रीमची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी foodies_snehal या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे.
पेरू आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- पेरू
- दूध
- कंडेन्स्ड मिल्क
- फ्रेश क्रीम
पेरू आईस्क्रीम बनवण्याची पद्धत..
- पेरू आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी एक पेरू स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या.
- आता पेरूच्या वरचा थोडासा भाग कापा.
- त्यामधून पेरूच्या आतला बऱ्याचसा गर बाहेर काढून घ्या.
- आता पेरूमध्ये आतून गोल भांड्यासारखा आकार आला असेल.
advertisement
- आता हा काढलेला गर आणि थोडं दूध टाकून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.
- तुम्ही पांढरा पेरू वापरत असाल आणि तुम्हाला गुलाबी रंग हवा असेल तर तुम्ही त्यात फूडकलर टाकू शकता.
- आता एका भांड्यात कंडेन्स्ड मिल्क आणि फ्रेश क्रीम घेऊन एकत्र करा.
- मिक्सरमध्ये बारीक केलेला पेरूचा गर या मिश्रणात गाळून टाका.
advertisement
- हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- आता हे मिश्रण रिकाम्या पेरूमध्ये भरा.
advertisement
- हा पेरू सिल्व्हर फॉईलने कव्हर करा.
- त्यानंतर हे पेरू आईस्क्रीम सेट होण्यासाठी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.
- दुसऱ्या दिवशी तुमचे आईस्क्रीम पूर्णपणे तयार होते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Guava Ice Cream : उन्हाळ्यात बाहेरचे थंड-गोड पदार्थ खाणं सोडा, घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी पेरू आईस्क्रीम!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement