Kelful Recipe : हिवाळ्यात शरिराला आरोग्यदायी, घरीच बनवा केळफुलाची भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हिवाळा सुरू झाला की केळीचा हंगाम सुरू होतो. त्यातच बाजारात केळफूल मिळते मिळते. केळफुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कल्याण : हिवाळा सुरू झाला की केळीचा हंगाम सुरू होतो. त्यातच बाजारात केळफूल मिळते मिळते. केळफुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळफूलात भरपूर फायबर, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे असल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, हिमोग्लोबिन वाढते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मासिक पाळीतील समस्या आणि वेदना कमी होतात. ही भाजी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात या फुलांना मागणी असते. केळफुलाची भाजी कशी बनवायची पाहुयात.
केळफुलाचीसाठी साहित्य
१ मध्यम आकाराचे केळफूल, १-२ कांदे (बारीक चिरलेले), कोथिंबीर, हिरवी मिरची, १ चमचा मोहरी, ८-१० कढीपत्ता पाने, १.५ चमचे आले-लसूण पेस्ट (ऐच्छिक), चवीनुसार मीठ, २-३ चमचे तेल, आवश्यकतेनुसार मसाले (हळद, लाल तिखट, गरम मसाला) हे साहित्य लागेल.
advertisement
केळफूल बनवण्याची कृती:
केळफूल साफ करणे: केळफुलाचे बाहेरील जांभळे पाकळ्या काढून टाका. आतील पांढरा भाग आणि प्रत्येक पाकळीतील एक दांडा (तो कडक असतो) काढून टाका. हे सर्व बारीक चिरून घ्या आणि पाण्यात ठेवा.
चीक काढणे: चिरलेल्या केळफुलाला मीठ चोळून अर्धा तास झाकून ठेवा, यामुळे त्याचा चीक निघून जातो आणि भाजी कडू लागत नाही. नंतर स्वच्छ धुवून घ्यावे.
advertisement
फोडणी देणे: एका कढईत तेल गरम करा. मोहरी, कढीपत्ता घालून तडतडू द्या.
कांदा परतणे: चिरलेला कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यात कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
केळफूल घालणे: आता बारीक चिरलेले केळफूल घालून चांगले परतून घ्या आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
मसाले घालणे: भाजी शिजत आल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला (आवडीनुसार) आणि चवीनुसार मीठ घाला.
advertisement
सर्व्ह करणे: गरमागरम केळफुलाची भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kelful Recipe : हिवाळ्यात शरिराला आरोग्यदायी, घरीच बनवा केळफुलाची भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video









