Paris Fashion Week : आलियाचा ग्लॅमरस अंदाज, ऐश्वर्यानं रॅम्प वॉक करत दिली 'नमस्ते पोझ'; B टाऊनच्या अप्सरांचा पॅरीसमध्ये जलवा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Aishwarya Rai Bachchan and alia bhatt paris fashion week : ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट्ट या दोघीही बॉलीवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. दोघीही पॅरीस फॅशन विकमध्ये एकत्र रॅम्प वॉक करताना दिसल्या. दोघी एकमेकींना टक्कर देताना दिसत आहेत. दोघींचे फोटो व्हायरल झाले असून चाहते कौतुक करत आहेत. कोणाचा लुक तुम्हाला सर्वाधिक आवडला?
advertisement
1/12

पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट्ट यांनी हजेरी लावली आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्पवर दोघींनी फॅशन कौशल्य दाखवले.
advertisement
2/12
ऐश्वर्या आणि आलिया दोघीही ब्युटी कंपनी लॉरियलच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. ऐश्वर्या गेली अनेक वर्षे या फॅशन वीकचा एक भाग आहे. तर आलिया या कंपनीसाठी पहिल्यांदाच रॅम्पवर वॉक केला.
advertisement
3/12
पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये ऐश्वर्याचा ग्रेसफुल लुक पुन्हा दिसला. तर आलिया नेहमीप्रमाणेच क्यूट दिसत होती.
advertisement
4/12
ऐश्वर्या रायने पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये रॅम्प चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने रेड सॅटिन फिनिश बलून मॅक्सी ड्रेस परिधान केला होता.
advertisement
5/12
ऐश्वर्याच्या ड्रेसला एक मोठी टेलही जोडलेली होती.
advertisement
6/12
हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने रेड बोल्ड लिप्स आणि फ्रीझी ओपन हेअरस्टाईल घातली होती.
advertisement
7/12
मोकळे केस सोडून स्वच्छंदी उडणाऱ्या एका अप्सरेसारखी तिनं एंट्री घेतली आणि सगळ्यांचं हृदय चोरलं. रॅम्प वॉक करून तिने सर्वांना 'नमस्ते' केले.
advertisement
8/12
या इव्हेंटमध्ये आलिया भट्टला पहिल्यांदा पाहण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते. आलिया खूपच स्टायलिश दिसत होती.
advertisement
9/12
तिने मेटॅलिक सिल्व्हर बस्टियर घातलेले दिसले. जे तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंप सूटसह पेअर केले होते.
advertisement
10/12
आलियाने कमीतकमी मेकअप आणि लहरी केसांसह ते कॅरी केले. यावेळी आलिया खूपच क्यूट दिसत होती.
advertisement
11/12
सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत सोशल मीडियावर या दोघांच्या लूकचे लोक कौतुक करत आहेत.
advertisement
12/12
काही जण तिला सुंदर म्हणत आहेत, तर काही जण हृदयाच्या इमोजीसह त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Paris Fashion Week : आलियाचा ग्लॅमरस अंदाज, ऐश्वर्यानं रॅम्प वॉक करत दिली 'नमस्ते पोझ'; B टाऊनच्या अप्सरांचा पॅरीसमध्ये जलवा