एकीकडे Dhurandhar चं सक्सेस दुसरीकडे अक्षय खन्नाला चढावी लागणार कोर्टाची पायरी, Drishyam 3 च्या मेकर्सने उचललं मोठं पाऊल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
धुरंधरनंतर अक्षय खन्ना दृश्यम 3 मध्ये दिसणार होता, पण त्याने सिनेमात काम नाकारले. दरम्यान अक्षय खन्नाला आता कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. दृश्यम 3 च्या मेकर्सनी मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/8

अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याने साकरलेला रहमान डकैत प्रेक्षकांना आवडला. धुरंधरनंतर अक्षय खन्ना दृश्यम 3 मध्ये दिसणार होता.
advertisement
2/8
प्रेक्षकांना दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्नाला पाहण्याची उत्सुकता होती. पण दृश्यम 3 ची पहिली झलक समोर आली आणि त्यात अक्षय खन्नाच गायब असल्याचं दिसलं. अक्षय खन्नानं दृश्यम 3 सिनेमा नाकारल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
3/8
एकीकडे धुरंधरचं सक्सेस सुरू असताना दुसरीकडे अक्षय खन्नाला कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. कारण दृश्यमचे मेकर्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
4/8
अक्षय खन्नाने दृष्यम 3 का सोडला याची इनसाइड स्टोरी सिनेमाच्या निर्मात्यांनी समोर आणली आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना सिनेमाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्ना खूप अनप्रोफेशनल असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
5/8
त्याने दृश्यम 3 चं कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. पैसेही मान्य केले होते मात्र शूटींगच्या दहा दिवस आधी त्याने सिनेम करण्यास नकार दिला.
advertisement
6/8
ते म्हणाले, "आम्ही अक्षय खन्नाकडून अँग्रीमेन्ट साइन केलं होतं. त्याच्याबरोबर बोलून पैशांची अमाउंटही लॉक केली होती. पण त्याने तिसऱ्या पार्टमध्ये विग घालायचा होता. पण डायरेक्टर अभिषेक पाठकने त्याला समजावलं की यामुले कंटीन्यूटी इश्यू येतील. प्रॅक्टिकली हे शक्य नाही. त्यानेही ते एकूण त्याची मागणी मागे घेतली होती. पण त्याच्या काही चमच्यांनी त्याला तो विग लावून छान दिसतो असं सांगितलं."
advertisement
7/8
"अभिषेक त्याच्याशी बोलयला तयार होता पण त्याने आमच्याशी बोलायला नकार दिला आणि सिनेमात काम करणार नाही असं सांगितलं. आम्ही अँग्रीमेन्ट साइन करून त्याला अँडवान्स दिले होते."
advertisement
8/8
"त्याच्या अशा वागण्यामुळे आमचं खूप नुकसान झालं आहे. मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्याला नोटीसही पाठवली आहे ज्याचं त्याने अद्याप उत्तर दिलेलं नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकीकडे Dhurandhar चं सक्सेस दुसरीकडे अक्षय खन्नाला चढावी लागणार कोर्टाची पायरी, Drishyam 3 च्या मेकर्सने उचललं मोठं पाऊल