बाबो! व्यक्तीने एका वर्षात ऑनलाईन खरेदी केले 1 लाख रुपयांचे कंडोम, पण त्याचं केलं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Online Condom Buying : ऑनलाईन डिलीव्हरी कंपनीच्या रिपोर्टनुसार 2025 या वर्षी लोकांनी दूध, दही आणि भाज्यांसह विविध वस्तूंची खरेदी केली, पण एका व्यक्तीची खरेदी आश्चर्यकारक होती.
advertisement
1/5

सध्या ऑनलाइन शॉपिंगचा काळ आहे. लोक घरबसल्या त्यांना हव्या असलेल्या वस्तू काही मिनिटांत घरातच मागवतात. सामान्यपणे कपडे, दागिने, घरगुती सामान अशा गोष्टी ऑनलाईन मागवल्या जातात. 2025 सालात कुणी काय काय मागवलं याची यादी एका बड्या ऑनलाईन डिलीव्हरी कंपनीने जारी केली आहे. ज्यामध्ये एक शॉकिंग घटना उघडकीस आली.
advertisement
2/5
कंपनीच्या रिपोर्टनुसार कंडोम हे ऑनलाइन खरेदी केलेले एक अतिशय लोकप्रिय उत्पादन बनलं आहे. दर 127 ऑर्डरपैकी एक कंडोमची असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सप्टेंबरमध्ये कंडोमच्या विक्रीतही 24 टक्के वाढ झाली.
advertisement
3/5
कंपनीच्या अहवालानुसार एका व्यक्तीने संपूर्ण वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कंडोम खरेदी केले. त्याने 228 ऑर्डर दिल्या आणि एकूण 1 लाख 06 हजरा 398 रुपयांचं बिल भरलं आहे. ही व्यक्ती भारताच्या चेन्नईतील असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
4/5
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच, इंटरनेट युझर्नी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कंडोम खाल्ले का, भाऊ? दुसरं काही काम होतं का? असं विचारलं आहे. तर काहींनी तो एक अद्भुत माणूस आहे, बाजारात जाऊन कंडोम खरेदी करायला लाज वाटत असेल, असं म्हटलं आहे.
advertisement
5/5
कंडोम सुरक्षित शारीरिक संबंध आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी पण इतके कंडोम? या व्यक्तीने इतक्या कंडोमचं काय केलं हे माहिती नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बाबो! व्यक्तीने एका वर्षात ऑनलाईन खरेदी केले 1 लाख रुपयांचे कंडोम, पण त्याचं केलं काय?