थोरला सुपरस्टार पण धाकटा ठरला सुपरफ्लॉप! स्टारकिड असून 10 वर्षांपासून स्ट्रगल करतोय 'हा' अभिनेता
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते एकाच कुटुंबातून एंट्री घेतात परंतु प्रत्येकाला यश आणि लोकप्रियता मिळत नाही. अशी अनेक उदाहरणं चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. साऊथ सिनेसृष्टीतील नागार्जुनला प्रत्येकजण ओळखतो आणि त्याचे चित्रपटही खूप पसंत केले जातात, परंतु लोकांमध्ये त्याचा मुलगा नागा चैतन्यबद्दल इतकी क्रेझ नाही. आज आपण, अशाच एका पॅन इंडिया स्टारविषयी सांगणार आहोत ज्याचा मोठा भाऊ बॅक टू बॅक हिट्स देत आहे, तर धाकट्याचे करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
1/8

हा तेलुगू अभिनेता आहे अल्लू सिरिश. ज्याचे वडील निर्माता, वितरक आणि व्यापारी आहेत तर भाऊ अल्लू अर्जुन सुपरस्टार आहे.
advertisement
2/8
अल्लू सिरिशने तेलगू चित्रपट गौरवम (2013) मधून मुख्य भूमिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली परंतु तो चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता पण दोन्ही ठिकाणी तो अयशस्वी झाला. अल्लू नंतर सिरिश कोठा जनता (2014), श्रीरस्तु सुभमस्तु (2016) आणि ओक्का क्षानम (2017) सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.
advertisement
3/8
अल्लू सिरीशने 'श्रीरस्तु सुभमस्तु' या चित्रपटातून खूप काळानंतर यश मिळालं. यामुळे त्याची लोकप्रियता खूप वाढली. यानंतर त्याला इतर मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स आल्या.
advertisement
4/8
2017 मध्ये, अल्लू सिरीश 1971: बियॉन्ड बॉर्डर्स मध्ये दिसला होता, जो एक मल्याळम चित्रपट होता परंतु दुर्दैवाने तो देखील फ्लॉप झाला. वॉर ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिझास्टर ठरला. हा चित्रपट 15 कोटी रुपयांमध्ये बनला होता ज्याने फक्त 6 कोटी कमावले होते.
advertisement
5/8
2017 मध्ये, सिरिश टॉलिवूड चित्रपट ओक्का क्षनम मध्ये दिसला आणि तो देखील फ्लॉप ठरला. हा चित्रपट फक्त 5 दिवस चित्रपटगृहात चालला. त्यातून एकूण 10 कोटी रुपये जमा झाले.
advertisement
6/8
2019 मध्ये, अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ ABCD: American Born Confused Desi मध्ये दिसला होता, जो 2013 च्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता पण तो एक मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.
advertisement
7/8
त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अल्लू सिरिशने फक्त एकच हिट चित्रपट दिला आहे, बाकी सर्व फ्लॉप आणि डिझास्टर ठरले. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या धाकट्या भावाचे करिअर चित्रपटसृष्टीत बरबाद होण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
8/8
तर दुसरीकडे अल्लू अर्जुन बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देत असून या वर्षी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तर दुसरीकडे त्याच्या धाकट्या भावाचे करिअर धोक्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थोरला सुपरस्टार पण धाकटा ठरला सुपरफ्लॉप! स्टारकिड असून 10 वर्षांपासून स्ट्रगल करतोय 'हा' अभिनेता