अमिताभ बच्चन यांच्या घरी सोन्याचं कमोड, बॉलिवूड अभिनेत्याने रिव्हील केला PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी 'गोल्डन टॉयलेट' असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. वयाच्या 83 वर्षीही ते तेवढेच सक्रीय आहेत. चित्रपट, केबीसी आणि जाहिरातींद्वारे ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजही त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे होतात.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत काम करत आहेत.
advertisement
3/7
अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये कल्कि 2898 AD (पार्ट 2), ब्रह्मास्त्र 2, आंख मिचौली 2, सेक्शन 84 या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्यांनी GIFT City प्रोजेक्य या गुजरात गांधीनगरमधील एका डेवलपमेंट प्रोजेक्टवरदेखील काम सुरू केलं आहे.
advertisement
4/7
अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून मुंबईतील जुहू येथील 'जलसा' या आलिशान बंगल्यात राहत आहेत. हे दोन मजली घर असून त्यात आधुनिक आणि पारंपारिक भारतीय वास्तुकलेचा मिलाफ असल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
5/7
सोशल मीडियावर सध्या 2016 चा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने आपले 10 वर्षांपूर्वीचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
6/7
विजय वर्माने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांच्या घरातील बाथरूममध्ये 'गोल्डन टॉयलेट' असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
7/7
विजय वर्माने अमिताभ बच्चन यांच्या 'गोल्डन टॉयलेट'सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"2016 माझ्यासाठी माइलस्टोन होतं. मला बिग बी आणि शूजित दा यांच्यासोबत 'पिंक' या सिनेमात प्रेमळ कास्ट आणि क्रूसोबत काम करण्याची संधी मिळाली. बच्चन जींच्या 'गोल्डन टॉयलेट'सोबत सेल्फीदेखील काढला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चन यांच्या घरी सोन्याचं कमोड, बॉलिवूड अभिनेत्याने रिव्हील केला PHOTO