TRENDING:

सुर्याने जिंकला शेवटचा वर्ल्ड कप, आता कॅप्टन सोबत 'हे' 5 खेळाडू पुन्हा दिसणार नाही

Last Updated:
वर्ल्डकपच्या समाप्तीनंतर आता पाच खेळाडूंचे टी20 करिअरही संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/13
सुर्याने जिंकला शेवटचा वर्ल्ड कप, आता कॅप्टन सोबत 'हे' 5 खेळाडू पुन्हा दिसणार नाही
मागच्याच रविवारी भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होत.भारताचा हा सलग दुसरा वर्ल्ड कप विजय होता.
advertisement
2/13
तीन वेळा वर्ल्डकप जिंकणारी भारत ही पहिली टीम ठरली होती. तसेय यजमान म्हणून वर्ल्ड कप जिंकणारी भारत ही पहिली टीम ठरली आहे.
advertisement
3/13
दरम्यान या वर्ल्डकपच्या समाप्तीनंतर आता पाच खेळाडूंचे टी20 करिअरही संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/13
या यादीत पहिले नाव येते ते म्हणजे पाकिस्तानचा सिनिअर खेळाडू बाबर आझमचे आहे.बाबर आझमसाठी यंदाचा वर्ल्ड कप खूपच खराब होता. कारण या वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट चालली नाही. तसेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होताच त्याच्या टेकनिक आणि स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
advertisement
5/13
बाबर आझमने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये फक्त 91 धावा केल्या होत्या. त्यामुळे या खराब कामगिरीनंतर आता बाबर आझमचं टी20 संघातील स्थान धोक्यात आलं आहे.
advertisement
6/13
दुसरा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आहे. तो देखील या वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरला होता. या वर्ल्डकपमध्ये त्याच्या बॅटीतून फक्त 62 धावा आल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या राऊंडआधीच स्पर्धेबाहेर झाली होती.
advertisement
7/13
क्रिकेट ऑस्ट्रेलिया नेहमीच ट्रांजिशनसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत मॅक्सवेलच वाढतं वय आणि खराब कामगिरी पाहता त्यांच्या जागी युवा खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
8/13
इंग्लंडच्या 2019 आणि 2022 वर्ल्डकप विजयाचा हिरो ठरलेला आदिल राशिद आता 38 वर्षांचा आहे. जगभरात सर्वात जबरदस्त स्पिनर गोलंदाज असलेल्या आदिल राशीदच्या गोलंदाजीची धार आता कमी झाली आहे.टी20 वर्ल्डकपमध्ये तो फक्त 13 विकेटच काढू शकला.
advertisement
9/13
स्पिनसाठी अनुकूल असलेल्या पिचवर त्याला विकेट काढण्यास खूप संघर्ष करावा लागतो आहे. त्यामुळे आता इंग्लंड क्रिकेट आता रेहान अहमदसारख्या खेळाडूंना संधी देतो आहे.त्यामुळे आदिल राशिदची करिअर संकटात येणार आहे.
advertisement
10/13
अफगाणिस्तान क्रिकेटचा पाया रचणारे मोहम्मद नबी आता 41 वर्षांचे झाले आहेत. क्रिकेट वर्तुळातला तो सर्वात म्हातारा टी20 खेळाडू आहे. नबीने आधीच हा वर्ल्डकप माझा शेवटचा असणार असल्याचे संकेत दिले होते.
advertisement
11/13
तसेच अफगाणिस्तान टीमकडे आता अनेक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यामुळे नबी निवृत्तीची घोषणा करू शकतात.या वर्ल्ड कपमध्ये नबीने 5 विकेट घेतले आणि 18 धावा केल्या होत्या.
advertisement
12/13
शेवटी येतो तो टीम इंडियाचा टी20 कॅप्टन सूर्यकुमार यादव. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप जिंकलेला. पण सूर्याचा या वर्ल्डकपमध्ये वैयक्तिक परफॉर्मन्स खूपच खराब होता.मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याकडून जशा खेळीची अपेक्षा होती,तशी खेळी हौऊ शकली नाही.
advertisement
13/13
सूर्यकुमार यादव आता 35 वर्षांचा आहे. आणि टीम इंडिया आता पुढच्या 2028 च्या वर्ल्डकपची तयारीला लागली आहे. अशापरिस्थितीत वर्ल्ड कप जिंकण्याची आपलं लक्ष्य साध्य केल्यानंतर सूर्याला आता नेतृत्व नव्या पिढीच्या हातात द्यावे लागणार आहे. सूर्यकुमारने पहिल्यांदाच त्याच्या नेतृत्वात भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता. या स्पर्धेत त्याने 9 सामन्यात 136.72 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या होत्या.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटन 30.25 होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
सुर्याने जिंकला शेवटचा वर्ल्ड कप, आता कॅप्टन सोबत 'हे' 5 खेळाडू पुन्हा दिसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल