आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप, अनन्या पांडे पुन्हा प्रेमात! विदेशी मॉडेलला करतेय डेट; केलं कन्फेस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आदित्य रॉय कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे पुन्हा प्रेमात पडली आहे. अनन्या एका विदेशी मॉडेलला डेट करतेय. कोण आहे तो?
advertisement
1/8

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनन्यानं शेअर केलेल्या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
2/8
अनन्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रेमाची कबूली दिली! अनन्याची पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. अनन्या पांडे एका विदेशी मॉडेलला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
3/8
अनन्याने त्याचा फोटो पोस्ट करत त्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 'तू बेस्ट आहेस' असं अनन्यानं म्हटलं आहे. वॉकर ब्लॅकोसाठी अनन्याने ही पोस्ट लिहिली आहे. वॉकरच्या बर्थडे निमित्तानं तिनं ही पोस्ट लिहिली आहे. तिने त्याला बर्थडे विश देखील केलं आहे.
advertisement
4/8
शिकागो-मियामीचा रहिवासी वॉकर अनेक वर्ष मॉडेलिंग करत होता. अनंत अंबानीच्या लग्नात अनन्या आणि वॉकर यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. तेव्हा अनन्याने त्याला 'पार्टनर' म्हटले होते.
advertisement
5/8
अंबानी क्रूझ पार्टीपासून सुरू झालेली त्यांची जवळीक आता सोशल मीडियावर उघडपणे दिसून येत आहे. अनन्याच्या मागील बर्थडेला वॉकरने तिच्यासाठी रोमँटिक पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिलेलं, "हॅप्पी बर्थडे ब्युटिफुल. आय लव्ह यू अँनी."
advertisement
6/8
अनन्या पांडे तिच्यापेक्षा मोठा असलेल्या आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. 2024 मध्ये दोघांचं ब्रेकअप जालं. त्यानंतर अनन्याचं नाव वॉकरशी जोडण्यात आलं.
advertisement
7/8
उदयपूरच्या लग्नात वॉकर देखील वॉकर दिसला होता. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये अनन्याने वॉकरला सपोर्ट केलेला. पण दोघांनीही याबाबत ऑफिशिअल स्टेटमेन्ट केलेलं नाही.
advertisement
8/8
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिचे 'कॉल मी बेब' आणि 'खो गये हम कहां' सारखे चित्रपट हिट आहेत. वॉकर आणि अनन्या एनिमल लवर आहेत. दोघांनी त्यांचं रिलेशन ऑफिशिअल केलेलं नाही पण फॅन्स त्यांना क्यूट कपल म्हणत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप, अनन्या पांडे पुन्हा प्रेमात! विदेशी मॉडेलला करतेय डेट; केलं कन्फेस