TRENDING:

BBM6: आयुषसाठी वाढतोय तन्वीचा पझेसिव्हनेस, पण कोण आहे अभिनेत्याच्या आयुष्यातील खरी मिस्ट्री गर्ल? नाव आलं समोर

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: या आठवड्याच्या 'भाऊचा धक्का'वर आयुष आणि तन्वीच्या मैत्रीच्या नात्यातील गुंतागुत पाहायला मिळाली. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती आयुषच्या खऱ्या आयुष्यातील 'मिस्ट्री गर्ल'ची.
advertisement
1/9
आयुषसाठी वाढतोय तन्वीचा पझेसिव्हनेस, पण कोण आहे अभिनेत्याची खरी मिस्ट्री गर्ल?
रिअ‍ॅलिटी शोच्या जगात कधी कोणाचं नशीब चमकेल आणि कोणाचं नातं संपेल, याचा नेम नसतो. सध्या 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात अशाच एका नात्यावरून हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे.
advertisement
2/9
प्रेक्षकांना वाटत होतं की, तन्वी कोलते आणि आयुष संजीव यांच्यात प्रेमाची पालवी फुटतेय, पण रुचिता जामदारच्या एका विधानाने या नात्याचा पायाच हादरवून टाकला आहे. हे नातं आता प्रेमाच्या त्रिकोणात अडकलंय की काय, अशी शंका येतेय.
advertisement
3/9
नेहमीप्रमाणे एका एपिसोडमध्ये घरात गप्पांची मैफल रंगली असताना रुचिता जामदारने एक असा बॉम्ब टाकला की, घरातील सदस्य सुन्न झाले. तन्वी आणि आयुषच्या वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना रुचिता म्हणाली, "हा बाहेर आधीच कमिटेड आहे, याची बाहेर गर्लफ्रेंड आहे!"
advertisement
4/9
विशेष म्हणजे, आयुषने जेव्हा याबद्दल जाब विचारला, तेव्हा रुचिताने चक्क तन्वीचंच नाव घेतलं. "हे मला तन्वीनेच सांगितलंय," असं म्हणत रुचिताने एका दगडात दोन पक्षी मारले. यानंतर आयुष आणि तन्वीच्या मैत्रीच्या नात्यात मिठाचा खडा पडला.
advertisement
5/9
हा वाद केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही. रितेश देशमुख यांच्या 'भाऊच्या धक्क्या'वर या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळाला. संतापलेल्या तन्वीने चक्क रितेशसमोर आयुषवर हात उचलला. आयुषने जेव्हा स्पष्ट केलं की, "मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही," तेव्हा तन्वीचा संयम सुटला.
advertisement
6/9
पंचिंग बॅगवर राग काढण्याऐवजी तिने थेट आयुषलाच लक्ष्य केलं. भर कार्यक्रमात झालेली ही शारीरिक हिंसा पाहून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. एका बाजूला मैत्रीचा दावा आणि दुसऱ्या बाजूला ही टोकाची चिड, यातून नेमकं काय साध्य होतंय, हेच कोणाला कळेनासं झालं आहे.
advertisement
7/9
आता चर्चा सुरू झाली आहे ती आयुषच्या खऱ्या आयुष्यातील 'मिस्ट्री गर्ल'ची. गेल्या काही काळापासून आयुषचं नाव 'वागले की दुनिया' फेम चिन्मयी साळवी हिच्याशी जोडलं जात आहे. आयुषने चिन्मयीच्या वाढदिवसाला केलेली ती खास पोस्ट चाहत्यांच्या आजही लक्षात आहे.
advertisement
8/9
"माझ्या करड्या आयुष्यातील तू गुलाबी रंग आहेस," अशा आशयाची पोस्ट शेअर करून आयुषने हिंट दिली होती. आता तन्वीसोबतचा हा राडा पाहून प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आयुषचं खरं प्रेम नक्की कोण? चिन्मयी की तन्वी?
advertisement
9/9
बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी अनेकदा लव्ह अँगलचा आधार घेतला जातो. आयुष आणि तन्वीचं हे भांडण खरोखरच भावनांमधून आलं आहे की, हा केवळ फुटेज मिळवण्याचा प्रयत्न आहे? असा प्रश्न घरातल्यांसह प्रेक्षकांनाही पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6: आयुषसाठी वाढतोय तन्वीचा पझेसिव्हनेस, पण कोण आहे अभिनेत्याच्या आयुष्यातील खरी मिस्ट्री गर्ल? नाव आलं समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल