TRENDING:

भित्र्यांनी चुकूनही पाहू नका ही सीरिज, रात्री दिवे बंद करून झोपताही येणार नाही! OTT वर आली डोकं सुन्न करणारी वेबसिरीज

Last Updated:
Best Horror Web Series: एका लेखिकेच्या नजरेतून सुरू होणारा हा प्रवास प्रेक्षकांना अशा एका जगात घेऊन जातो, जिथे वैज्ञानिक तर्क संपतात आणि अदृश्य शक्तींचा खेळ सुरू होतो.
advertisement
1/9
भित्र्यांनी चुकूनही पाहू नका ही सीरिज, रात्री दिवे बंद करून झोपताही येणार नाही!
तुम्हाला असं वाटतं का की भुतं केवळ पडद्यावरच असतात? जर तुमचं उत्तर 'हो' असेल, तर जरा थांबा! कारण एमएक्स प्लेयर आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर एक अशी वेबसिरीज आली आहे, जी पाहताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
2/9
या सिरीजचं नाव आहे 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री'. ही केवळ कल्पना नाही, तर भारताचे सर्वात प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या आजही न सुटलेल्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित ही खरी कहाणी आहे.
advertisement
3/9
सिरीजची सुरुवातच अशा एका दृश्याने होते की पाण्याचा घोटही गळ्यात अडकल्यासारखा वाटतो. थंडगार शवगृह आणि समोर पडलेला गौरव तिवारी यांचा मृतदेह... पोलीस याला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न करत असतात, पण गौरवच्या गळ्यावर असलेले ते विचित्र काळे निळे वण काहीतरी वेगळंच सांगत असतात.
advertisement
4/9
एका लेखिकेच्या नजरेतून सुरू होणारा हा प्रवास प्रेक्षकांना अशा एका जगात घेऊन जातो, जिथे वैज्ञानिक तर्क संपतात आणि अदृश्य शक्तींचा खेळ सुरू होतो.
advertisement
5/9
गौरव तिवारी हे कधीकाळी आकाशात विमान उडवण्याचं स्वप्न पाहणारे पायलट होते. पण एका विमान प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत अशी काही अलौकिक घटना घडली की त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
advertisement
6/9
त्यांनी 'इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी' स्थापन केली आणि आपल्या सहकाऱ्यांसह भारतातील सर्वात भीतीदायक जागांचे रहस्य शोधायला सुरुवात केली. सुरुवातीची पाच वर्षे सगळं नीट होतं, पण हळूहळू गौरवच्या मागे अशा काही गोष्टी लागल्या, ज्यांनी अखेर त्यांचा जीवच घेतला.
advertisement
7/9
या सिरीजमध्ये गौरव तिवारींची भूमिका अभिनेता करण टॅकर याने साकारली आहे. त्याची अस्वस्थता, त्याचं ते डार्क सीन्स मधलं वागणं इतकं जिवंत आहे की पाहताना भीती वाटते. दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी ही सिरीज केवळ हॉरर जॉनर म्हणून बनवलेली नाही, तर ती एका माणसाच्या मानसिक संघर्षाची कथा आहे.
advertisement
8/9
करणसोबतच कल्कि कोचलिन, सलोनी बत्रा आणि दानिश सूद या कलाकारांनी या सस्पेन्समध्ये अधिक भर घातली आहे. १२ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिरीजला IMDb वर ८.३ रेटिंग मिळाले आहे. यावरूनच तिची लोकप्रियता लक्षात येते.
advertisement
9/9
ही सिरीज तुम्हाला विचार करायला भाग पाडते की, आपण ज्या जगात राहतो, त्याच्या समांतर अजून एक भयानक जग अस्तित्वात आहे का? जर तुमचं मन खंबीर असेल आणि तुम्हाला खऱ्या घटनांवर आधारित रहस्यमय कथा आवडत असतील, तर 'भय' ही तुमच्यासाठीच आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भित्र्यांनी चुकूनही पाहू नका ही सीरिज, रात्री दिवे बंद करून झोपताही येणार नाही! OTT वर आली डोकं सुन्न करणारी वेबसिरीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल