Bharat Jadhav : 22 वर्ष अन् भरत जाधवच्या 'सही रे सही'चा 4444वा प्रयोग; कधी, कुठे आणि किती वाजता?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल दि बेस्ट', 'आमच्या सारखे आम्हीच', 'मोरूची मावशी' यांसारखी एक ना अनेक नाटक मराठी रंगभूमीवर गाजवणारे अभिनेते भरत जाधव. यंदाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाचा विश्वविक्रमी प्रयोग होणार आहे.
advertisement
1/6

गेली अनेक दशकं अवितरपणे सुरू असलेल्या सही रे सही या नाटकाचा 4444 वा प्रयोग 15 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
advertisement
2/6
फक्त सही रे सही नाही तर भरत जाधव या दिवशी मनोरंजनाचा ट्रिपल धमाका करणार आहेत. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकाचे प्रयोग ते करणार आहेत.
advertisement
3/6
मोरूची मावशी, सही रे सही आणि अस्तित्व अशी तीन नाटकं एकाच दिवशी भरत जाधव करणार आहेत.
advertisement
4/6
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत जाधव यांच्या तीन नाटकांचे सलग प्रयोग होणार आहेत. 15च्या सकाळी 'अस्तित्व', तर दुपारी 'मोरूची मावशी' आणि संध्याकाळी 'पुन्हा सही रे सही' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
advertisement
5/6
'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा 4444 वा प्रयोग आहे. मोरूची मावशी नाटकाचा 862वा प्रयोग आहे तर अस्तित्व या नाटकाचा 58 वा प्रयोग आहे.
advertisement
6/6
भरत जाधव यांही तिन्ही नाटकं वेगळ्या धाटणीची आहेत. तीनही नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील, अशा भावना भरत जाधव यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bharat Jadhav : 22 वर्ष अन् भरत जाधवच्या 'सही रे सही'चा 4444वा प्रयोग; कधी, कुठे आणि किती वाजता?