Bharati Singh : 'चांगलंय मला मुलगी नाहीये...' मुलीसाठी घेतला सेकंड चान्स, आता असं का म्हणतेय भारती सिंह?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री भारती सिंहला मुलगी हवी होती त्यासाठी ती दुसऱ्यांदा आई झाली. पण तिला दुसऱ्यांदाही मुलगाच झाला. आता मला मुलगी नाहीये ते चांगलं आहे असं भारती म्हणतेय. ती असं का म्हणाली?
advertisement
1/7

कॉमेडियन भारती सिंह नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. भारतीला मुलगी हवी होती पण तिला दुसऱ्यांदाही मुलगीच झाली. सुरुवातीला ती मुलगी झाली नाही म्हणून नाराज होती. पण आता ती स्वत:च म्हणतेय की मुलगी नाही झाली तेच चांगलं आहे. भारती सिंह असं का म्हणाली?
advertisement
2/7
भारतीला दुसरा मुलगा झाला पण तिनं नाराजी व्यक्त केली नाही. उलट तिने दुसऱ्या मुलाचंही आनंदानं स्वागत केलं. दरम्यान भारतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती म्हणतेय, देवाचे आभार की त्याने मुलगी दिली नाही.
advertisement
3/7
भारती सिंह डेली व्लॉग शेअर करत असते. तिच्या व्लॉगला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो. दरम्यान तिच्या एका व्लॉगमध्ये तिचा मुलगा गोला म्हणजेच लक्ष घर सोडून जाण्याबद्दल बोलत असतो. हे ऐकूण भारती प्रचंड इमोशनल झाली आणि रडू लागली.
advertisement
4/7
तिने मुलाला समजावलं आणि त्याने समजून घेतलं. मी तुला सोडून कधीच जाणार नाही असं म्हणत भारतीला मिठी मारली. त्यानंतर भारतीने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "गोल असं म्हणाला तेव्हा मी खूप घाबरले. मी माझ्या मुलाला माझ्या डोळ्यांसमोरून दूर करण्याचा विचारही करू शकत नाही."
advertisement
5/7
"मुली एक दिवस आपलं घर सोडून सासरी जातात. हा किती दु:खाचा क्षण असतो. असं वाटतं की देवाचे आभार की त्याने आम्हाला मुलगी दिली नाही तर मी हा विचार करून मेले असते की तिचं संगोपन करून, मोठं करून सासरी पाठवायचं आहे."
advertisement
6/7
"धन्य आहेत ते आई-वडिल ज्यांना मुलगी आहे. त्यांना ते इतकं शिकवतात, संस्कार देतात आणि काळजावर दगड ठेवून त्यांचं लग्न करतात. काही मुलं असतात जी आई-वडिलांना घरातून बाहेर काढतात."
advertisement
7/7
भारती सिंह सध्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर घरी आहे. तिनं नुकतंच लाफ्टरशेफचं शूटिंग सुरू केलं आहे. भारतीला पोस्ट प्रेग्नंसीनंतर पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bharati Singh : 'चांगलंय मला मुलगी नाहीये...' मुलीसाठी घेतला सेकंड चान्स, आता असं का म्हणतेय भारती सिंह?