TRENDING:

The 50 मध्ये मोठा ट्विस्ट, जान्हवी किल्लेकरनंतर निक्की तांबोळीचाही पत्ता कट? कोणी दिला धोका?

Last Updated:
The 50 Show: रिअ‍ॅलिटी शो 'द 50' रोज नवनवीन वळणं घेत आहे. ५० स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता पुढील टप्प्याकडे सरकत असतानाच, चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
1/10
The 50 मध्ये मोठा ट्विस्ट, जान्हवी किल्लेकरनंतर निक्की तांबोळीचाही पत्ता कट?
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेला आणि तितकाच आव्हानात्मक रिअ‍ॅलिटी शो 'द 50' रोज नवनवीन वळणं घेत आहे. ५० स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता पुढील टप्प्याकडे सरकत असतानाच, चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
2/10
आपल्या बिनधास्त वागण्यामुळे आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहणारी निक्की तांबोळी या शोमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस १४' आणि 'खतरों के खिलाडी' मध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या निक्कीचा पत्ता अशा प्रकारे कट होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
3/10
निक्की तांबोळीने या शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल सोबत एन्ट्री घेतली होती. पण ताज्या रिपोर्ट्सनुसार, निक्कीचा या शोमधील प्रवास आता संपला आहे. 'फिल्म विंडो'ने दिलेल्या माहितीनुसार, एका महत्त्वाच्या टास्कमध्ये पराभूत झाल्यामुळे निक्कीला शोमधून बाहेर पडावं लागलं आहे.
advertisement
4/10
सिद्धार्थ आर. कन्ननच्या ताज्या रिपोर्टनुसार, शोमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा एलिमिनेशन धमाका होणार आहे. एकामागून एक तब्बल ६ तगड्या स्पर्धकांचा पत्ता कट झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
advertisement
5/10
मिळालेल्या माहितीनुसार, सिवेत तोमर, दिव्या अग्रवाल, अदनान शेख, फैज बलोच, चाहत पांडे आणि निक्की तांबोळी या सहा जणांचा शोमधील प्रवास संपला आहे.
advertisement
6/10
हे सर्व स्पर्धक एकाच वेळी बाहेर पडणार की एकापाठोपाठ एक, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण जर ही बातमी खरी असेल, तर शोमधील निम्म्याहून अधिक ग्लॅमर आता गायब होणार आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती अधिकृत घोषणेची.
advertisement
7/10
येणाऱ्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना सर्वात मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'रिअ‍ॅलिटी शो किंग' प्रिन्स नरुलाला एका कठीण वळणावर उभं केलं जाणार आहे. प्रिन्सला त्याचा लाडका शिष्य सिवेत तोमर आणि मराठमोळा शिव ठाकरे या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितली जाईल.
advertisement
8/10
रिपोर्ट्सनुसार, प्रिन्सने मैत्री आणि खेळाचा विचार करत शिव ठाकरेची निवड केली आहे. प्रिन्सच्या या एका निर्णयामुळे सिवेत तोमरला थेट घराबाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. ज्या सिवेतला प्रिन्सचा वारसदार मानलं जात होतं, त्याचा पत्ता स्वतः प्रिन्सनेच कट केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.
advertisement
9/10
अद्याप वाहिनीकडून याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सोशल मीडियावर निक्कीच्या नावाची एक्झिट आता कन्फर्म मानली जात आहे.
advertisement
10/10
आतापर्यंत जवळपास २० स्पर्धक बाहेर पडले असून, निक्कीच्या जाण्याने शोमधील उरलेल्या सदस्यांची समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः अरबाज पटेल आता निक्कीशिवाय हा खेळ कसा खेळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
The 50 मध्ये मोठा ट्विस्ट, जान्हवी किल्लेकरनंतर निक्की तांबोळीचाही पत्ता कट? कोणी दिला धोका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल