TRENDING:

Bigg Boss 19 : वडिलांमुळे आयुष्य संपवणार होती तान्या मित्तल, रडत-रडत केला शॉकिंग खुलासा, नेमकं काय घडलं?

Last Updated:
नुकतंच नॉमिनेशनच्या वेळी एक खूप मोठा तमाशा झाला, ज्यात अभिनेत्री तान्या मित्तलने तिच्या आयुष्यातील एक भयानक अनुभव सांगितला आहे. तिचं म्हणणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
advertisement
1/7
वडिलांमुळे आयुष्य संपवणार होती तान्या मित्तल, रडत-रडत केला शॉकिंग खुलासा
मुंबई: सलमान खानचा ‘बिग बॉस १९’ हा शो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. रोज होणारे वाद, बदलती नाती आणि धक्कादायक खुलासे यामुळे शोचा टीआरपी वाढला आहे.
advertisement
2/7
नुकतंच नॉमिनेशनच्या वेळी एक खूप मोठा तमाशा झाला, ज्यात अभिनेत्री तान्या मित्तलने तिच्या आयुष्यातील एक भयानक अनुभव सांगितला आहे. तिचं म्हणणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
advertisement
3/7
या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये कुनिका सदानंदने तान्या मित्तलला नॉमिनेट केलं. यावेळी कुनिकानी तान्याच्या संस्कारांवर आणि आईच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
advertisement
4/7
हे ऐकून तान्याला खूप वाईट वाटलं आणि ती अक्षरशः ढसाढसा रडू लागली. तिला रडताना पाहून सगळेच कुनिका सदानंदवर चिडले.
advertisement
5/7
तान्या मित्तलने रडत-रडत सांगितलं की, तिने तिच्या वडिलांकडून खूप मार खाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. ती म्हणाली, “मी वडिलांकडून मार खाऊन-खाऊन इथपर्यंत पोहोचले आहे, नाहीतर त्यांनी १९ व्या वर्षीच माझं लग्न लावून दिलं असतं. मी खूप संघर्ष करून इथपर्यंत आले आहे आणि तरीही कुनिका सदानंद म्हणतेय की, माझी परवरिश चांगली झाली नाही.”
advertisement
6/7
तान्या पुढे म्हणाली, “मी माझ्या आईला देव मानते. ती नसती, तर मी आज इथे नसते. माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं असतं, म्हणून मला आत्महत्या करायची होती.”
advertisement
7/7
तान्याचा हा खुलासा ऐकून सगळेच स्तब्ध झाले. नंतर घरातल्या इतर स्पर्धकांनी तिला समजावलं आणि स्ट्राँग राहायला सांगितलं. नॉमिनेशनमधील या वादानंतर सगळेच कुनिका सदानंदच्या विरोधात उभे राहिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 : वडिलांमुळे आयुष्य संपवणार होती तान्या मित्तल, रडत-रडत केला शॉकिंग खुलासा, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल