भाऊ कदमची तयारी मला दिसत नाही!
एका मुलाखतीत बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, “मी भाऊ कदम यांना ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलोय, कारण ते नेहमी आमच्यासोबत असायचे. भाऊ कदम खूप शांत बसतात, काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची तयारी तुम्हाला दिसत नाही.”
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “तो असा माणूस आहे, जोपर्यंत तो शूटिंगवर असतो, त्याचं डोकं नेहमी विचार करत असतं. एकाच डायलॉगचे अनेक व्हर्जन तो तयार करत असतो. तो इतका शांत असतो की, बाजूच्या कोणालाही कळत नाही की तो इतका विचार करतोय. तो त्याच्या कामाबद्दल खूप सिरिअस असतो आणि तो खूप टॅलेंटेड आणि इंटेलिजेंट आहे.”
advertisement
इन्स्पेक्टर झेंडेची थरारक कहाणी!
मनोज बाजपेयींचा नवा चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा मुंबई पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. झेंडे यांनी कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला दोन वेळा पकडलं होतं. यात चार्ल्स शोभराजची भूमिका जिम सर्भने केली आहे, तर मनोज बाजपेयी इन्स्पेक्टर झेंडेच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची सुरुवातच चार्ल्स शोभराजच्या गुन्हेगारी जगाने आणि त्याच्या खास अंदाजाने होते. हा माणूस इतका चलाख दाखवला आहे की, लोक सहज त्याच्या बोलण्याला फसून जातात. मग एंट्री होते इन्स्पेक्टर झेंडेची आणि दोघांमध्ये सुरू होतो पकडापकडीचा रोमांचक खेळ.
