TRENDING:

Creta ची निघाली हवा! Maruti Victoris Vs क्रेटा मायलेज आणि सेफ्टीमध्ये कोणती चांगली? संपूर्ण माहिती

Last Updated:
Victoris ही मारुतीची दुसरी 5 स्टार रेटिंग एसयूव्ही आहे. या Victoris चा सामना थेट हुंदईच्या hyundai creta शी आहे. त्यामुळे Victoris Vs hyundai creta नेमकी चांगली कोणती आहे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
advertisement
1/9
Creta ची निघाली हवा! Maruti Victoris Vs क्रेटा मायलेज आणि सेफ्टीमध्ये कोणती चांग
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून जास्त मायलेज देणाऱ्या आणि आरामदायक वाहनांची निर्मिती करते. अलीकडे मारुती सुझुकीने मार्केटचा ट्रेंड ओळखून दमदार अशा SUV लाँच करण्याचा धडका लावला आहे. अशातच मागील आठवड्यात Victoris नावाची SUV लाँच करण्यात आली आहे. Victoris ही मारुतीची दुसरी 5 स्टार रेटिंग एसयूव्ही आहे. तर मायलेजही Victoris चं उत्तम आहे. या Victoris चा सामना थेट हुंदईच्या hyundai creta शी आहे. त्यामुळे Victoris Vs hyundai creta नेमकी चांगली कोणती आहे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
advertisement
2/9
Maruti Suzuki Victoris ही एक मिडसाईज एसयूव्ही आहे. ही मारुती सुझुकीची दुसरी फाईव्ह स्टार रेटिंग ठरली आहे. याआधी स्विफ्ट डिझायरला BNCAP टेस्टमध्ये फाईव्ह रेटिंग मिळाले होते. त्यानंतर आता Victoris ला BNCAP च्या चाचणीत ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये प्रवाशांच्या सेफ्टीसाठी 32 मधून 31.66 गूण मिळाले आहे. तर लहान मुलांसाठी 49 पैकी 43 गूण मिळाले आहे.
advertisement
3/9
hyundai creta ला किती रेटिंग - hyundai creta ही एक दमदार आणि लोकप्रिय एसयूव्ही आहे. CRTA ला BNSCAP मध्ये चाचणी अद्याप केलेली नाही. पण ग्लोबल GNCAP सेफ्टी रेटिंगमध्ये ३ स्टार मिळाले आहे. मोठे आणि लहान मुलांसाठी सेफ्टीसाठी ३ स्टार रेटिंग CRTA ला मिळाले आहे.
advertisement
4/9
Maruti Suzuki Victoris मध्ये 6 एअरबॅग, ब्रेक असिस्टसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह 3 पॉइंट सीटबेल्ट आणि Isofix चाइल्ड सीट एंकर दिला आहे. तसंच या गाडीत ADS 2 लेव्हल सिस्टिम दिलं आहे. तसंच या गाडीत ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अडेप्टिव क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, रिअर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट आणि अन्य इतर फिचर्स दिले आहे. 
advertisement
5/9
CRTA फिचर्स - hyundai creta ला 2022 मध्ये ग्लोबल एनसीएपीमध्ये चाचणी झाली होती, तेव्हा तिला ३ स्टार रेटिंग मिळाले होते. सेफ्टी फिचर्स व्यतिरिक्त विचार केला तर CRETA मध्ये 6 एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससह ईबीडी आणि ईएससी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, Isofix अँकर, सेंट्रल लॉकिंग आणि पांच 3 पॉइंट सीट बेल्ट बेस व्हेरिएंट दिले आहे. एडीएएस सूट एसएक्स टेकही देण्यात आले आहे. या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर एसएक्स (O) ट्रीम उपलब्ध आहे. 
advertisement
6/9
मायलेज कुणाचं जास्त?  Maruti Suzuki Victoris मायलेज - Maruti Suzuki Victoris मध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे. पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे. पेट्रोल व्हेरियंट हे २१ किमी मायलेज देते. Maruti Victoris मध्ये सीएनजीचा ही पर्याय दिला आहे.
advertisement
7/9
सीएनजी व्हेरियंटमध्ये २७ किमी मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. तर Maruti Victoris मध्ये आता माईल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड दिलं आहे. स्ट्राँग हायब्रिडमध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही गाडी तब्बल २८.६५ किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. 
advertisement
8/9
आता CRETA चं किती मायलेज?  CRETA मध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन आहे. तर 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिन दिलं आहे. पेट्रोल इंजिनमध्ये क्रेटा १७.७ किमी मायलेज देते. तर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १८.४ किमी मायलेज देते. तर १.५ लिटर डिझेल मध्ये २१ ते १९.१ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. 
advertisement
9/9
Victoris या एसयूव्हीची किंमत कंपनीकडून अजूनही जाहीर केलेली नाही. मात्र, Victoris ची किंमत 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या Victoris ची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Creta ची निघाली हवा! Maruti Victoris Vs क्रेटा मायलेज आणि सेफ्टीमध्ये कोणती चांगली? संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल