TRENDING:

WPL : गुजरातच्या 'फिल्डिंग सेन्सेशन'ने एका बॉलमध्ये फिरवली मॅच, पाहून जॉन्टी ऱ्होड्स-सूर्याची आठवण येईल!

Last Updated:
गुजरातची फिल्डिंग सेनसेशन अनुष्का शर्माने फक्त एका बॉलमुळे डब्ल्यूपीएलच्या अख्ख्या मॅचचं चित्र बदललं आहे.
advertisement
1/5
गुजरातच्या 'फिल्डिंग सेन्सेशन'ने एका बॉलमध्ये फिरवली मॅच, पाहून जॉन्टी आठवेल!
डब्ल्यूपीएलच्या चौथ्या सामन्यामध्ये गुजरात जाएंट्सने दिल्लीचा 4 रननी पराभव केला आहे. गुजरातने दिलेल्या 210 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली जिंकेल असं वाटत होतं, पण गुजरातच्या फिल्डरने केलेल्या कामगिरीने ही मॅच फिरली.
advertisement
2/5
शेवटच्या 2 ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 29 रनची गरज होती, तेव्हा गुजरातने काश्वी गौतमच्या हातात बॉल दिला. 19 व्या ओव्हरचा पहिलाच बॉल काश्वीने नो बॉल टाकला, ज्यावर जेमिमा रॉड्रिग्जने मोठा फटका मारला.
advertisement
3/5
जेमिमाने मारलेला हा शॉट बाऊंड्री लाईनबाहेर जाईल, असं वाटत होतं, पण अनुष्का शर्माने बाऊंड्री लाईनवर विश्वास बसणार नाही अशी फिल्डिंग करून सिक्सच्या दिशेने जाणारा बॉल पुन्हा मैदानात फेकला.
advertisement
4/5
अनुष्का शर्माच्या या कामगिरीमुळे गुजरातच्या 4 रन वाचल्या, ज्याचा फायदा त्यांना नंतर झाला. काश्वीने टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये तब्बल 22 रन आल्या, त्यामुळे दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 7 रनची गरज होती.
advertisement
5/5
गुजरातने शेवटची ओव्हर सोफी डिव्हाईनला दिली, ज्यात तिने फक्त 2 रन देऊन 2 विकेटही घेतल्या, त्यामुळे गुजरातने हा सामना 4 रननी जिंकला. अनुष्का शर्माने फिल्डिंगमध्येही 4 रनच वाचवल्या होत्या, त्यामुळे या फिल्डिंगमुळे गुजरातने हा सामना जिंकला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL : गुजरातच्या 'फिल्डिंग सेन्सेशन'ने एका बॉलमध्ये फिरवली मॅच, पाहून जॉन्टी ऱ्होड्स-सूर्याची आठवण येईल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल