TRENDING:

Mumbai : मिठी नदीत बुडवून राहुलचा मर्डर, 6 महिन्यांनी आरोपी सापडला, सत्य समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!

Last Updated:

मुंबईमध्ये 6 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येला धक्कादायक वळण लागलं आहे. 26 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मित्राच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 20 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पीएफ खात्यातून 30 हजार रुपये काढले आणि हे पैसे ऑनलाईन गेमिंगवर खर्च केले, त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे.
मिठी नदीत बुडवून राहुलचा मर्डर, 6 महिन्यांनी आरोपी सापडला, सत्य समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली! (AI Image)
मिठी नदीत बुडवून राहुलचा मर्डर, 6 महिन्यांनी आरोपी सापडला, सत्य समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली! (AI Image)
advertisement

आरोपी अंकित शाहू आणि राहुल कुमार योगेंद्र प्रसाद खरवर (वय 26) हे दोघे मित्र होते. दोघेही कुर्ला पश्चिम भागामध्ये राहत होते. खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या राहुलने पीएप खात्यातून पैसे काढण्यासाठी अंकितची मदत मागितली, कारण अंकित तंत्रज्ञानात पारंगत होता. पीएफच्या पैशातले 30 हजार रुपये अंकितने राहुलच्या पीएफ खात्यातून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. आपल्या संमतीशिवाय अंकितने हे पैसे काढल्याचं राहुलला समजलं, तेव्हा त्याने पैसे परत मागितले. यानंतर अंकितने राहुलला युपीआय व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवून पैसे परत केल्याचं सांगितलं. राहुलने मात्र अंकितने पैसे परत दिले नसल्याचा दावा मित्रांकडे केला.

advertisement

24 जुलैला 2025 ला राहुल कुर्ला पश्चिमच्या बैल बाजार भागातील त्याच्या घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबाने मित्र आणि नातेवाईकांकडे राहुलची चौकशी केली. तिथेही राहुल सापडत नसल्यामुळे कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि राहुलचा मोबाईल ट्रॅक केला, पण सुरूवातीला पोलिसांनी कोणतेच ठोस पुरावे मिळाले नाहीत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

राहुल कुर्ल्यामधील मिठी नदीमध्ये बुडाला, पण मुख्य संशयित म्हणून अंकितची ओळख पटायला 6 महिने लागले. मागच्या आठवड्यात राहुलच्या कुटुंबाने अंकितवर संशय घेतला, त्यानंतर तपासात प्रगती झाली. अंकितची आई राहुलच्या कंपनीमध्येच काम करत होती. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या अंकितने 30 हजारांची परतफेड टाळण्यासाठी राहुलला नदीमध्ये ढकलल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अंकितला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मिठी नदीत बुडवून राहुलचा मर्डर, 6 महिन्यांनी आरोपी सापडला, सत्य समजताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल