TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : पाचव्या आठवड्यात भाऊचा डबल धक्का! 2 सदस्य 'आऊट', वेगळ्या प्रकारे Elimination

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात रितेश भाऊंनी डबल धक्का दिला आहे.
advertisement
1/5
BBM6 : पाचव्या आठवड्यात भाऊचा डबल धक्का! दोघं 'आऊट', वेगळ्या प्रकारे Elimination
रविवार आला की बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते ती घरातील कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार. कारण यादिवशी एव्हिक्शन होतं. पण यावेळी आता एव्हिक्शनमध्येही बदल करण्यात आला आहे. सदस्यांसह हा प्रेक्षकांनाही मोठा धक्का आहे. बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात डबल एव्हिक्शन होणार असल्याचं रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सांगितलं.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धकांना घेण्यात आलं. त्यापैकी राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओमकार राऊत हे 4 सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता घरात 13 सदस्य उरले आहेत. यात दिपाली सय्यद, रुचिता जामदार, अनुश्री माने, राकेश बापट, रोशन भजनकर, करण सोनावणे, प्राजक्ता शुक्रे, प्रभू शेळके, आयुष संजीव, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सागर कारंडे, विशाल कोटियन यांचा समावेश आहे.
advertisement
3/5
पाचव्या आठवड्यात 13 पैकी 6 सदस्य नॉमिनेट आहेत. यात सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, राकेश बापट, प्रभू शेळके, आयुष संजीव यांचा समावेश आहे. या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर पडणार आहे. डबल एव्हिक्शन होणार असल्याचं रितेश देशमुख सांगतो. तसंच यावेळी वेगळ्या पद्धतीने एव्हिक्शन होणार असल्याचंही तो सांगतो.
advertisement
4/5
प्रोमोत तुम्ही पाहू शकता बेडरूममध्ये एक छोटा दार आहे, ज्याच्या आत काही सदस्य जातात. बेडरूममध्ये बॅग्ज पॅक केलेल्या दिसत आहेत. यानंतर दुसरा एक दरवाजा उघडतो. जिथून सेफ सदस्य घरात येणार असल्याचं रितेश सांगतो.
advertisement
5/5
आता घरातील कोणते दोन सदस्य घराबाहेर आणि कोणते सुरक्षित राहणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. बहुतेकांनी आयुष, सचिन, करण यांचं नाव घेतलं आहे. तर काहींनी राकेशला बाहेर काढलं तर बरं होईल असं म्हटलं आहे. प्रभू सेफ असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. प्राजक्ताबाबत मात्र फार कुणी काही शक्यता वर्तवलेली नाही. तुम्हाला काय वाटतं कोणते सदस्य बिग बॉस मराठी 6 च्या घरातून आऊट होतील आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : पाचव्या आठवड्यात भाऊचा डबल धक्का! 2 सदस्य 'आऊट', वेगळ्या प्रकारे Elimination
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल