इतके वेडे लोक...! Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre : रविवारी (15 मार्च) बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राजक्ता शुक्रेने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सुरांची राणी आणि घरामध्ये संयमाने खेळणारी प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि रविवारी भाऊचा धक्कावर पुन्हा एकदा सुन्न करणारी शांतता पसरली. प्राजक्ताचं बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडणं म्हणजे बाल्कनी ग्रुपला मोठा धक्का आहे. घराबाहेर येताच तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
2/7
घरातील अनुभवाबाबत प्राजक्ता म्हणाली, खूपच छान होता. घरात राहून मी खूप काही शिकले. बिग बॉसचं बोलणं असो, रितेश यांचं आम्हाला आरसा दाखवणं असो, लोकांशी डील करणं, त्या घरात एवढ्या तणावात संयम राखणं यातून मी खूप शिकले.
advertisement
3/7
टॉप 5 मध्ये कोण असेल याबाबत विचारलं असता प्राजक्ताने राखी, विशाल, राकेश, तन्वी यांची नावं घेतली आणि पाचवा सदस्य सागर किंवा प्रभू असावा अशी इच्छा आहे, असं ती म्हणाली. घरात असलेल्यांपैकी सागरला सगळ्यात जास्त मिस करत असल्याचं तिने सांगितलं.
advertisement
4/7
घरातील सगळ्यात खास क्षण कोणता असं विचारलं असता तिने रितेश देशमुख जेव्हा भाऊ बनून माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते, तो क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहिल असं सांगितलं. अनुश्रीसोबत झालेल्या वादात रितेशने प्राजक्ताची बाजू घेतली होती.
advertisement
5/7
घरातील स्वत:च्या खेळाबाबत प्राजक्ताने सांगितलं की, "मी घराबाहेर जशी आहे, घरातही तशीच राहो, यासाठी माझा प्रयत्न होता. तुमच्या घरातील मुलगी त्या घरात कशी वावरेल तसाच प्रयत्न मी करत होते आणि मी तेच केलं. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलं", असं म्हणत तिने सगळ्या प्रेक्षकांचे तिने आभार मानले आहेत.
advertisement
6/7
रितेश देशमुखबाबत विचारलं असता कलर्स मराठीशी बोलताना ती म्हणाली, "ते खूपच कमाल असे होस्ट आहेत. इतक्या वेड्या लोकांना सांभाळणं, वेडे लोक यासाठी म्हणेन कारण सगळ्यांना इतकं बोलायचं असतं, ते हँडल करणं खूप कठीण आहे. पण रितेश ते खूप छान करतात. रितेश मला आधीपासूनच आवडतात, आता त्यांच्याशी असा थेट संवाद साधता आला, याचा मला खूप आनंद आहे"
advertisement
7/7
या आठवड्यात नॉमिनेशनच्या कचाट्यात एकूण सहा जण अडकले होते. यामध्ये प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, संकेत पाठक, रेवा कौरसे आणि अनुश्री माने यांचा समावेश होता. मात्र खरी टांगती तलवार अनुश्री, रेवा आणि प्राजक्ता यांच्यावर होती. सुरुवातीपासूनच प्राजक्ता बॉटम दोन स्पर्धकांमध्ये गणली जात होती. अखेर मतांच्या आधारावर प्राजक्ताला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
इतके वेडे लोक...! Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेची पहिली प्रतिक्रिया